"दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:24 PM2024-09-05T16:24:38+5:302024-09-05T16:25:22+5:30

सूर्यादादा तुळजाला बायको बनवून घरी आणणार आहे. त्यामुळे त्याच्या बहिणीही खूश आहेत. आपल्या लाडक्या डॉक्टर वहिनीसाठी सूर्यादादाच्या बहिणींनी गोरी गोरी पान या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार केलं आहे. 

lakhat ek amcha dada serial surya dada sisters new version of gori gori pan for tulja vahini | "दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

"दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

'लाखात एक आमचा दादा' या छोट्या पडद्यावरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्याही शर्यतीत असते. या मालिकेतील सूर्यादादा आणि तुळजा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर असून मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत तुळजा आणि सूर्याचं लग्न झाल्याचं दाखविण्यात येणार आहे. खुद्द डॅडीच तुळजाचं सूर्याबरोबर लग्न लावणार आहेत. 

बहिणींवर जीव ओवाळून टाकणाऱ्या सूर्यादादाचं तुळजावर किती प्रेम आहे, हे त्याच्या बहिणींनाही माहीत आहेत. त्यामुळेच तुळजाचं सत्यजीतबरोबर लग्न होणार असल्याने बहिणीही दुखावल्या गेल्या होत्या. पण, आता सूर्यादादा तुळजाला बायको बनवून घरी आणणार आहे. त्यामुळे त्याच्या बहिणीही खूश आहेत. आपल्या लाडक्या डॉक्टर वहिनीसाठी सूर्यादादाच्या बहिणींनी गोरी गोरी पान या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार केलं आहे. 

सूर्यादादाच्या बहिणींचं गोरी गोरी पान व्हर्जन

“गोरी गोरी पान फुलासारखी छान, 
दादा आम्हाला तुळजा वहिनी आण. 

 

डॉक्टर आमच्या वहिनीची आम्ही घेऊ काळजी, 
तिच्यासमोर तुझी चालणार नाही मर्जी...

तिच्या शब्दांचा आम्ही ठेवणार हो मान, 
दादा आम्हाला तुळजावहिनी आण. 

वहिनीला आणायला दादाची गाडी, 
दादाच्या गाडीला काजू-पुड्याची जोडी..

दादा आणि वहिनी कसे दिसती छान छान, 
दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...


दरम्यान, सूर्यादादाचं तुळजावर असलेलं प्रेम लपून राहिलेलं नाही. पण, तुळजाचं मात्र तिचा डॉक्टर मित्र सिद्धार्थवर प्रेम आहे. त्यामुळे सूर्यादादाचा हार्टब्रेक होतं. पण, तरीदेखील सूर्यादादा तुळजाला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी, सिद्धार्थला आणि तिला एकत्र आणण्यासाठी तुळजाला मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्या तुळजाला भर मांडवातून पळवून घेऊन जातं. पण, तुळजाला पळवून नेणं त्याला महागात पडणार आहे. त्याला डॅडींच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. 

Web Title: lakhat ek amcha dada serial surya dada sisters new version of gori gori pan for tulja vahini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.