पोरस या मालिकेतील लक्ष लालवाणीला या नावाने सगळे मारतात हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:35 PM2018-08-08T15:35:54+5:302018-08-08T15:36:38+5:30
टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा लाडका कलाकार लक्ष सध्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. पोरस ही मालिका प्रचंड भव्य दिव्य असून या मालिकेचे बजेट देखील खूप जास्त आहे. या मालिकेतील रंगभूषा, वेशभूषा यांवर तर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे.
पोरस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील कलाकारांना या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना आता या मालिकेच्या व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखायला लागले आहेत.
टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा लाडका कलाकार लक्ष सध्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. पोरस ही मालिका प्रचंड भव्य दिव्य असून या मालिकेचे बजेट देखील खूप जास्त आहे. या मालिकेतील रंगभूषा, वेशभूषा यांवर तर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. या मालिकेतील लक्षची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्याने आपल्या असामान्य अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करून सोडले आहे. पोरस मालिकेत पोरसची मध्यवर्ती भूमिका करणारा पोरस सांगतो की, लोक मला आता लक्ष म्हणून नाही, तर पोरस म्हणून ओळखू लागले आहेत. माझे नाव लक्ष आहे याचा लोकांना आता विसर पडलेला आहे.
आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी लक्षने प्रचंड परिश्रम घेतले आहेत, याची प्रेक्षकांना चांगलीच जाणीव आहे. या मालिकेतील त्याच्या अभिनयाबद्दल खूप कौतुक होत आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून त्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी ही मालिका सुरू झाल्यापासून मी लक्ष नाही तर पोरसच आहे असे मला वाटायला लागले आहे.
याबद्दल बोलताना लक्ष सांगतो, “मला प्रत्यक्ष जीवनात देखील पोरस असल्यासारखे वाटू लागले आहे. मी पोरसचे आयुष्य जगतो आहे आणि ते मला खूप आवडते आहे. मी बर्याच दिवसात मुंबईला गेलेलो नाही. कारण आम्ही येथे उंबरगावला चित्रीकरण करत आहोत. मी काम करताना, व्यायाम करताना, झोपताना माझ्या व्यक्तिरेखेचाच विचार करत असतो. या मालिकेचा भाग होता आले हे मी माझे भाग्य समजतो. ही मालिका सर्वार्थाने भव्य व्हावी यासाठी निर्मात्यांनी कोणतेच प्रयत्न करण्याचे बाकी ठेवलेले नाहीत.”