लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवरील लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 04:05 AM2018-05-29T04:05:56+5:302018-05-29T09:35:56+5:30
कलर्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांन प्रत्येक भागामध्ये दिसणारे ...
क र्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांन प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचं सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार यामुळे. त्या गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षकांना या व्यतिरिक्त मालिकेमधील अजून एक पात्र आवडत आहे आणि ते म्हणजे बाब्या. बाब्या म्हणजे मालिकेमधील लक्ष्मीचा जीवाभावाचा मित्र. लक्ष्मी मालिकेमध्ये या बाब्या बरोबर गावामध्ये बरीच फिरताना दिसते, लक्ष्मीला कुठली दुखापत झाली, तिला कधी कोणाची गरज भासली कि, हा बाब्या तिच्या बरोबर सावली सारखा असतो. लक्ष्मी बरोबर असलेला तिचा हा गोड मित्र तिच्या प्रत्येक जखमेवरील मलमच आहे. लक्ष्मी त्याच्यासोबत रमते, त्याच्या मिश्कील स्वभावामुळे, त्याच्या खोड्यांमुळे तिला तिच्या दु:खाचा क्षणभर का होईना पण विसर पडतो. या बाब्याचे आणि लक्ष्मीचे पडद्यामागे देखील खूप चांगले नाते आहे.
प्रत्येक मालिकेमध्ये एक लहान मुलं असलं कि, दिवस कसा निघून जातो हे कळत नाही, थकव्याचा देखील विसर पडतो. संपूर्ण सेटवर चैतन्यपूर्ण वातावरण असते. सेटवर सगळ्यांच्याच मनामध्ये हि लहान मुलं त्यांची एक विशेष जागा निर्माण करतात. तसचं काहीसं लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेच्या सेटवर झाले आहे. मालिकेमधील बाब्या... बाब्या म्हणजे वेद आंब्रे. वेद ठाण्याला रहातो आणि सेटवर जमलेल्या गट्टीमुळे तो लक्ष्मी बरोबरच सेटवर येण जाणं करतो. अभ्यास देखील सेटवरच पार पडतो. पण सेटवरील सगळेच याला “चपडचपड” असे बोलावतात. कारण वेदची सेटवर प्रचंड बडबड सुरु असते आणि सगळी बडबड झाल्यानंतर त्याचे असे म्हणणे असते कि, “मी काही बोलतच नाही” अशा या मिश्कील आणि लाघवी स्वभावाच्या वेदने लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर सगळ्यांचेच मनं जिंकले आहे. लक्ष्मी आणि बाब्याचे पडद्यावर आणि पडद्यामागे खूपच छान जमते जे प्रेक्षकांना मालिकेमध्ये देखील दिसून येते. सेटवर वेद फक्त त्याच्या आईलाच घाबरतो आणि त्याचे बाबा बरोबर असतील तर त्याची सेटवर धम्माल – मस्ती सुरु असते. इतकेच नसून त्याच्या खाण्याचे देखील बरीच नखरे आहेत असे कळाले आहे, पण ते तर प्रत्येकच लहान मुलाचे असतात. अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजेच मालिकेमध्ये त्याचा लुक खूपच साधा आहे त्यामुळे पडद्यामागे तो वेगवेगळे लुक्स स्वत:हूनच ट्राय करत असतो जसे स्पाईक्स करणे, चष्मे घालणे.
त्यामुळे आता प्रेक्षकांना कळालेच असेल कि, हा बाब्या आणि लक्ष्मीची जोडी मालिकेमध्ये तर धम्माल आहेच पण पडद्यामागे देखील धम्माल आहे.