खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार 'लक्ष्मी निवास'ची जान्हवी, थाटामाटात पार पडलं केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:28 IST2025-02-05T10:28:08+5:302025-02-05T10:28:25+5:30
मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यातही दिव्या पुगावकर लग्नबंधनात अडकणार आहे.

खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार 'लक्ष्मी निवास'ची जान्हवी, थाटामाटात पार पडलं केळवण
Divya Pugaonkar: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमधून अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' (Laxminiwas) मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने जान्हवीची भूमिका साकारली आहे. नुकतंच मालिकेत जान्हवीचं लग्न पार पडलं आहे. मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यातही दिव्या पुगावकर लग्नबंधनात अडकणार आहे.
दिव्या लवकरच तिचा प्रियकर अक्षय घरत(Akshay Gharat) सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. नुकतंच दिव्या आणि अक्षयचं केळवण मोठ्या थाटामाटत पार पडलं. 'लक्ष्मीनिवास' मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी हे खास केळवण माजघर येथे आयोजित केलं होतं.यासाठी माजघर पूर्ण सजवण्यात आलं. या केळवणासाठी अक्षया देवघर, हार्दिक जोशी, हर्षदा खानविलकर, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड यासोबतच मालिकेतील सगळेच कलाकार या केळवणासाठी हजर आहेत.
दिव्या पुगावकर ही बऱ्याच कालावधीपासून अक्षय घरतसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत. दोघांच्याही घरी आता लगीनघाई सुरू झाली आहे. पण, दिव्यानं लग्नाची तारीख अद्याप चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही.