'या' खास व्यक्तीसोबत लतिकाचं लंच डेट; अक्षया नाईकचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:35 IST2022-05-02T17:38:46+5:302022-05-03T11:35:29+5:30
Akshaya Naik: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक खास व्यक्तीदेखील आहे.

'या' खास व्यक्तीसोबत लतिकाचं लंच डेट; अक्षया नाईकचा व्हिडीओ व्हायरल
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (Akshaya Naik) . या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. अक्षयादेखील कायम चाहत्यांसोबत काही ना काही गोष्टी शेअर करत असते. यावेळी तिने चक्क एका खास व्यक्तीसोबत लंच डेटवर गेल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सी फूडची चव घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली आहे. सोबतच तिच्यासोबत एक खास व्यक्तीदेखील आहे.
अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या आईसोबत लंच डेटवर गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तिची ही खास व्यक्ती म्हणजे तिची आईच असल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्षया सोशल मीडियावर कायम तिचे नवनवीन व्हिडीओ पोस्ट करत असते. यात अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेमही मिळतं. अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरलीपूर्वी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.