'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:13 AM2024-09-22T11:13:26+5:302024-09-22T11:14:03+5:30

'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्ये अनेक टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी आहेत.

Laughter chef reality show rahul vaidya caught in fire accident after reem shaikh | 'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...

'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...

'लाफ्टर शेफ' (Laughter Chef)  हा रिएलिटी शो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झालेले एकानंतर एक सेलिब्रिटी अपघाताला सामोरे जात आहेत. आधी रिम शेख हिचा चेहऱ्यावरच आगीचा भडका उडाला. तर आता राहुल वैद्यसोबतही (Rahul Vaidya) हेच घडलं आहे. शो मध्ये डिश बनवताना राहुलच्या अंगावर आगीचा भडका उडाला. यामुळे सगळेच शॉक झाले. 

'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्ये अनेक टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी आहेत. कृष्णा अभिषेक-कश्मिरा शाह, विकी जैन-अंकिता लोखंडे, राहुल वैद्य, निया शर्मा, करण कुंद्रा, अली गोनी यांच्यासह आणखी काही सेलिब्रिटी आहेत. तर भारती सिंह शोची होस्ट आहे. शोमध्ये या सर्व सेलिब्रिटींना एखादी डिश बनवण्याचं चॅलेंज दिलं जातं. दरम्यान स्वयंपाक येत नसल्याने त्यांना अनेकदा जमत नाही. इतकंच नाही तर आग लागण्यासारख्याही घटना आता घडत आहेत. शो टीआरपीत टॉप ला आहे मात्र सेलिब्रिटींसाठी जीवघेणा होत चालला आहे. राहुल वैद्यसोबत नुकतीच अशी घटना घडली. डिश बनवत असताना अचानक त्याच्या चेहऱ्यावर आगीचा भडका उडाला. यानंतर सगळेच ओरडले. यामधून राहुल थोडक्यात वाचला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


राहुलच्या आधी रिम शेखसोबतही अशीच दुर्घटना घडली होती. रिमचा चेहरा भाजला होता. हळूहळू तिचा चेहरा आता पूर्वपदावर येत आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने याची झलकही दाखवली.


दरम्यान या शोला नजर लागली अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. एकामागोमाग एक अपघात होत असल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच शोचे मेकर्स खबरदारी का घत नाहीत? असा सवालही उपस्थित केला आहे. 

Web Title: Laughter chef reality show rahul vaidya caught in fire accident after reem shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.