Video: "तुझ्याशिवाय मी अपूर्ण..."; भर कार्यक्रमात अशोक सराफांना लक्ष्याचा फोन, कलाकारांचे डोळे पाणावले
By कोमल खांबे | Updated: March 10, 2025 18:01 IST2025-03-10T17:59:37+5:302025-03-10T18:01:32+5:30
स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अशोक सराफ यांना भर कार्यक्रमात लक्ष्याचा फोन येतो.

Video: "तुझ्याशिवाय मी अपूर्ण..."; भर कार्यक्रमात अशोक सराफांना लक्ष्याचा फोन, कलाकारांचे डोळे पाणावले
मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता ज्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं ते म्हणजे अशोक सराफ. नुकतंच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कलाविश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आता पार पडणाऱ्या स्टार प्रवाह सोहळ्यात लाडक्या अशोक मामांचा गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्काळ्यार सोहत अशोक सराफ यांना खास सरप्राइज मिळणार आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अशोक सराफ यांना भर कार्यक्रमात लक्ष्याचा फोन येतो. "हॅलो, अशोक...अरे आपण जवळजवळ ५० चित्रपट एकत्र केले. खूप मज्जा...तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरुन आले बघ. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील", असं लक्ष्या म्हणत आहे. हे ऐकून उपस्थितांचे डोळेही पाणावल्याचं दिसत आहे. तर अशोक सराफही भावुक झाले आहेत.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी कलाविश्वात अतिशय लोकप्रिय जोडी. त्यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनयासोबत कॉमेडीची जुगलबंदी करत अशोकमामा आणि लक्ष्याने एक काळ गाजवला. आयत्या घरात घरोबा, शेजारी शेजारी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, अशी ही बनवाबनवी, गडबड घोटाळा, फेका फेकी, चंगू मंगू, आमच्यासारखे आम्हीच अशा एक सो एक सिनेमांत त्यांनी एकत्र काम केलं होतं.