'# लय आवडतेस तू मला' उत्कंठावर्धक वळणावर, सानिकासमोर येणार सरकारचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:08 IST2025-01-21T16:08:14+5:302025-01-21T16:08:34+5:30

# Lay Aavdtes Tu Mala Serial : पंकजा, सर्वेश आणि सई यांच्या कपटी कारस्थानांमुळे सरकार-सानिकामध्ये अखेर दुरावा येणार आहे.

'# Lay Aavdtes Tu Mala' Serial takes a thrilling turn, the truth of the government will come before Sanika | '# लय आवडतेस तू मला' उत्कंठावर्धक वळणावर, सानिकासमोर येणार सरकारचं सत्य

'# लय आवडतेस तू मला' उत्कंठावर्धक वळणावर, सानिकासमोर येणार सरकारचं सत्य

कलर्स मराठीवरील '# लय आवडतेस तू मला' (# Lay Aavdtes Tu Mala Serial) मालिकेत सानिका आणि सरकारच्या आयुष्यातील संकटं काही संपण्याचे नाव घेत नाहीये. पहिले पंकजा आणि सर्वेशच्या कुरघोड्या आणि कट आणि आता त्यात सईची भर पडली आहे. सरकार आणि सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी सई एक संधी देखील सोडत नाही आहे.

सरकारच्या वाढदिवसापासून सईसमोर सरकार-सानिकाच्या प्रेमाचे सत्य आले आहे. पण, सानिका अजून सरकारच्या एका सत्यापासून अनभिज्ञ आहे आणि ते म्हणजे राजा म्हणजेच साखरगावच्या अप्पासाहेबांचा मुलगा सरकार आहे. सई आता याचाच फायदा घेऊन दोघांमध्ये फूट पाहताना दिसणार आहे. सानिका सरकारच्या गोड नात्याला लागणार आहे सईची दृष्ट. आता सईमुळेच सानिकासमोर येणार सरकारचं सत्य. येत्या भागांमध्ये सरकारचे सत्य समोर आल्यावर राजा म्हणजेच सरकारला सानिका जाब विचारताना दिसणार आहे. पंकजा, सर्वेश आणि सई यांच्या कपटी कारस्थानांमुळे सरकार - सानिकामध्ये अखेर दुरावा येणार आहे. 


मकर संक्रांतीच्या दिवशी सरकारने सानिकाला लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याच्याबद्दलचे सगळे सत्य त्याने सांगितले. पण ती चिठ्ठी पंकजाने बदलली, हे अजूनही सानिकाला माहिती नाही आहे. तसेच सई खेळत असलेली खेळी देखील अजून सरकारने सानिकाला सांगितली नाही. सानिकावर हल्ला करणाऱ्या सईला राजा समजावतो की तू जे काही करते आहेस त्याला प्रेम नाही स्वार्थ म्हणतात. पंकजा सर्वेशला सरकारची चिठी दाखवून म्हणते राजा कळशीचा आहे. नेमकं हे सई चोरून ऐकते. सानिकाला सई कडून चिट्ठी मिळते त्या चिट्ठीत सरकार आप्पा बरोबर फोटो आहे आणि त्यात राजा कळशीचा सरकार आहे आणि आप्पा धुमळांचा मुलगा आहे असं कळतं.  सानिका चिडून राजाला जाब विचारायला जाते, सरकार समजावण्याचा प्रयत्न करतोय की त्याने सगळं खरं आधीच मकर संक्रांतीला सांगितलं आहे. पण सानिका मात्र त्याचं काहीचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.
आता पुढे काय होणार ? आपण खरं बोलत आहे हे सरकार सानिकाला पटवून देऊ शकेल? हे पाहणे कमालीचे ठरेल. 

Web Title: '# Lay Aavdtes Tu Mala' Serial takes a thrilling turn, the truth of the government will come before Sanika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.