जाणून घ्या इंडियाज बेस्ट ड्रामेबाझच्या मुंबईतील ऑडिशनबाबत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 08:47 AM2018-05-11T08:47:06+5:302018-05-11T14:17:06+5:30
लहान मुलांसाठीचा अभिनयावर आधारित टॅलेन्ट हंट शो - इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझच्या पहिल्या दोन सीझनच्या प्रचंड लोकप्रियता आणि अभूतपूर्व यशानंतर ...
ल ान मुलांसाठीचा अभिनयावर आधारित टॅलेन्ट हंट शो - इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझच्या पहिल्या दोन सीझनच्या प्रचंड लोकप्रियता आणि अभूतपूर्व यशानंतर झी टीव्ही आता तिसऱ्या सीझनची घोषणा करत आहे. हा पारिवारिक मनोरंजनाचा कार्यक्रम असून देशभरातील कानाकोपऱ्यातील बच्चे कलाकार आपली कला, प्रभावी व्यासपीठ उपस्थिती, खट्याळपणा आणि सर्वांत वर म्हणजे आपली अभिनय कला यांसह प्रेक्षकांना थक्क करतील. आपल्या अभिनयाच्या उत्कट आवडीतून मनोरंजनाच्या दुनियेत आपले असाधारण भविष्य घडवण्यासाठी या छोट्या कंपनीसाठी ही एक उत्तम संधी आहे. इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझमधून झी टीव्हीचे मूळ तत्त्व आज लिखेंगे कल अगदी उत्तमप्रकारे प्रतीत होते. देशभरात या शो च्या ऑडिशन्स सुरू होत असून आता हा शो मुंबई शहरातील कलाकारांना त्यांची ताकद दाखवण्यासाठी १३ मे २०१८ रोजी निमंत्रित करत आहे. ५ ते १४ वयोगटातील मुले या शो च्या ऑडिशन्समध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्या अपत्यामध्ये आपल्या ब्लॉकबस्टर प्रदर्शनासह लोकांना जिंकून घेण्याची क्षमता असेल. तो किंवा ती उद्याची सुपरस्टार बनू शकत असेल तर इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ सीझन ३ ऑडिशन्समध्ये सहभागी व्हा आणि त्यांना राष्ट्रीय वाहिनीवर त्यांची कला दाखवण्याची संधी द्या. इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझ सीझन ३ ऑडिशन्सचे मुंबई शहरात रविवार, १३ मे २०१८ रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, जीएम कॉलनी, यादव नगर, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००७२ येथे सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजन करण्यात येत आहे. ऑडिशन गेट्स ५ ते १४ वयोगटातील सर्व छोट्या अभिनयप्रेमींसाठी खुली असतील. तुमच्या अपत्याची अभिनयकला सर्वोत्तम पद्धतीने प्रदर्शित करता येतील असा २-३ मिनीटांचा अॅक्ट ऑडिशन्ससाठी त्यांच्याकडून तयार करून घ्या आणि देशातील पुढील सुपरस्टार बनण्याची त्यांची क्षमता सर्वांसमोर मांडा.
इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझमध्ये प्रत्येक ड्रामेबाझाला अनेक टास्क आणि चॅलेन्जेसच्या श्रृंखलेतून जावे लागेल, ज्यामुळे एक अभिनेता म्हणून त्यांच्या कलात्मकता, स्पॉन्टेनिटी आणि अभिनय क्षमतेची परीक्षा घेतली जाईल. येत्या काही दिवसांमध्ये झी टीव्हीचे टॅलेन्ट स्काऊट्स पुणे, जम्मू, इंदौर, गुवाहाटी, वाराणासी, रांची, लखनौ, पाटणा, भोपाळ, कोलकाता, जयपुर, अमृतसर, चंदिगड, डेहराडून, अहमदाबाद, बेंगलोर, दिल्ली आणि मुंबई अशा अनेक शहरांमध्ये ऑडिशन्सचे आयोजन करतील.