गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:47 AM2023-07-27T10:47:06+5:302023-07-27T11:01:34+5:30

गेल्या काही दिवसातली ही तिसरी किंवा चौथी घटना आहे.

leopard enters in goregaon film city on a marathi serial set 200 crew members were present | गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल

गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल

googlenewsNext

मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याने दर्शन दिलं आहे. यामुळे सेटवरील सर्वांची घाबरगुंडी उडाली. यावेळी मराठी मालिका 'सुख म्हणजे काय असतं' च्या सेटवर बिबट्याने एंट्री घेतली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर काहीच दिवसांपूर्वी बालकलाकार मायरा वायकुळची हिंदी मालिका 'नीरजा' च्या सेटवर बिबट्या आल्याने खळबळ माजली होती.

गोरेगावच्या फिल्मसिटीत अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग सुरु असतं. प्रत्येक सेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर जवळच संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने काही वर्षांपासून इथे बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे क्रू मेंबर्समध्ये भीतीचं वातावरण आहे. कालच सायंकाळी चारच्या सुमारास मराठी मालिका 'सुख म्हणजे काय असतं' च्या सेटवर बिबट्या घुसला. तेव्हा सेटवर २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. गेल्या काही दिवसातली ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. बिबट्याचा शिरल्याचा व्हिडिओ एएनआयने ट्वीट केला आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता म्हणाले, 'गेल्या १० दिवसात तिसऱ्यांदा की चौथ्यांदा ही घटना घडली आहे. २०० पेक्षा जास्त लोक सेटवर होते. यातल्या कोणाचाही जीव गेला असता. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.'

Web Title: leopard enters in goregaon film city on a marathi serial set 200 crew members were present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.