या मालिकेसाठी मेलिस पैसने घेतले भोजपुरी नृत्याचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 07:09 AM2018-03-30T07:09:09+5:302018-03-30T12:39:09+5:30

अभिनेत्री मेलिसा पैस स्टार प्लसवरील हर शांख पे ऊल्लू बैठा ही मध्ये मलाईची भूमिका करत असून प्रेक्षकांना हा शो ...

The lessons of Bhojpuri dance taken by Melis Pais for this series | या मालिकेसाठी मेलिस पैसने घेतले भोजपुरी नृत्याचे धडे

या मालिकेसाठी मेलिस पैसने घेतले भोजपुरी नृत्याचे धडे

googlenewsNext
िनेत्री मेलिसा पैस स्टार प्लसवरील हर शांख पे ऊल्लू बैठा ही मध्ये मलाईची भूमिका करत असून प्रेक्षकांना हा शो आणि मलाईची व्यक्तिरेखा आवडत आहे. ह्या शोसाठी तिने केवळ भाषेचेच नव्हे तर भोजपुरी डान्सिंगचेही प्रशिक्षण घेतले. मेलिसा म्हणाली, “ह्या शो ची संकल्पना भोजपुरी असून याला युपीची पार्श्वभूमी आहे आणि त्यासाठी शोमध्ये भोजपुरी डान्सची गरज होती. मी भोजपुरी कलाकार आणि डान्सिंग सेंसेशन्स मोनालिसा ऊर्फ अंतरा बिस्वास यांचे अनेक व्हिडीओज्‌ पाहिले. मला ह्या शोमध्ये डान्स करायला मिळणार आहे हे कळल्यावर मला खूप आनंद झाला कारण डान्स करायला मला मनापासून आवडतो. मलाईच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी भोजपुरी डान्स शैलीचा सराव केला. मला आशा आहे की प्रेक्षकांना ह्या शोवरील माझा डान्स आवडेल.”

या आधी मेलिसा या कार्यक्रमासाठी भोजपुरी भाषा ही शिकली आहे. मेलिसा मुळची गोव्यातील कॅथलिक ख्रिस्ती असली तरी  बरीच वर्षं ती मुंबईत राहिली आहे आणि अनेक हिंदी मालिकांमध्येही भूमिका रंगविल्या आहेत. जेव्हा हिंदी मालिकांमध्ये प्रथम भूमिका रंगविण्यास तिने सुरुवात केली, तेव्हा तिला हिंदी बोलणंही अवघड जात होतं. आता या मालिकेत मलाईच्या भूमिकेत भोजपुरी ढंगाची हिंदी बोलायतेय. ही भाषा बोलता येईल की नाही,याबद्दल ती साशंक होती. पण शेवटी या समस्येवर मात करण्याचा निर्धार तिने केला आणि तिला भाषा शिकविण्यासाठी एका भोजपुरी शिक्षकाची नेमणूक केली. ही भाषा शिकता शिकता तिच्या प्रेमात पडल्याने तिला हि भाषा शिकण्याची मजा वाटू लागली.


मेलिसा ह्या मालिकेत सीएम चैतु लालच्या वहिनीची भूमिका मेलिसा साकारत असून ती हसमुख आहे. ह्या शोमध्ये मलाईचा मस्त डान्स पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

Web Title: The lessons of Bhojpuri dance taken by Melis Pais for this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.