​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 04:40 AM2018-04-24T04:40:29+5:302018-04-24T10:11:01+5:30

मालिकेचे शीर्षक गीत हे त्या मालिकेची ओळख असते. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचे चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या ...

The likes of 'small ownership' is popular with the audience | ​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

googlenewsNext
लिकेचे शीर्षक गीत हे त्या मालिकेची ओळख असते. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचे चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नाते सांगणारे शब्द असा उत्तम योग्य जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.
'वाऱ्यावर पसरले सूर मखमली, मनामंदी झुलली माझ्या तुझी सावली, रानोवनी पानोपानी प्रीत जागली, नजरेला जेव्हा तुझ्या नजर भेटली' असे रोमँटिक शब्द असलेले हे शीर्षक गीत आहे. या गाण्यातून छोटी मालकीण रेवती आणि श्रीधर यांच्यातली केमिस्ट्रीही दिसून येते. त्यांच्या अव्यक्त नात्याविषयीही हे गाणे खूप काही सांगून जाते. नव्या दमाचे गीतकार वैभव देशमुख यांच्या शब्दांना संगीतकार देवेंद्र भोमेने संगीतबद्ध केले आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने त्याच्या खास शैलीत हे गाणे गायले आहे. दररोज संध्याकाळी वाजणाऱ्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. तसेच हे गाणे अनेकांच्या मोबाईलची रिंगटोन झाले आहे. या गाण्याचे फिमेल व्हर्जन श्रुती आठवलेने गायले आहे.
शीर्षक गीताविषयी आणि स्टार प्रवाहसोबत असलेल्या नात्याविषयी आदर्श शिंदे सांगतात, "स्टार प्रवाहबरोबर काम करताना अगदी घरच्यासारखे वातावरण असते. स्टार प्रवाहबरोबर चार-पाच मालिकांची गाणी मी गायलोय. स्टार प्रवाहने मला मोठे केले असेही म्हणता येईल. कारण स्टार प्रवाहचा रिअॅलिटी शो 'आता होऊन जाऊ द्या' मधून मी महाराष्ट्रासमोर आलो. त्यामुळे स्टार प्रवाहशी माझे कायमच छान सूर जुळतात. मी आजवर गायलेल्या गाण्यांत 'छोटी मालकीण' हे एक वेगळे आणि खास असे गाणे आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतंय याचा मला आनंद आहे."
"माझ्या पहिल्याच मराठी मालिकेसाठी शीर्षक गीत करण्याची संधी दिल्याबद्दल मी स्टार प्रवाहचा आभारी आहे. मी या पूर्वी एका हिंदी मालिकेचे शीर्षक गीत केले होते. छोटी मालकीणचे शीर्षक गीत करणे हे नक्कीच आव्हानात्मक होते. गाणे जरी रोमँटिक असले तरी त्याचा बाज लोकसंगीताचा आहे. आदर्शनेही या गाण्यासाठी ओपन व्हॉईस न लावता रोमँटिक व्हॉइस लावला आहे. त्यामुळे हे गाणे श्रवणीय झाले. हे गाणे प्रेक्षकांना आवडतंय ही माझ्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे,' असे संगीतकार देवेंद्र भोमेने सांगितले.

Also Read : ​नोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली 'छोटी मालकीण'

Web Title: The likes of 'small ownership' is popular with the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.