‘लिविंग विद अ सुपरस्टार सैफअली खान' छोट्या पडद्यावर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2016 12:40 PM2016-12-20T12:40:56+5:302016-12-20T12:42:36+5:30

‘लिविंग विद अ सुपरस्टार' या शोच्या माध्यमातून नवाब सैफ अली खान छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.दिग्दर्शक समर खान ...

'Living with a superstar Saif Ali Khan' on a small screen? | ‘लिविंग विद अ सुपरस्टार सैफअली खान' छोट्या पडद्यावर ?

‘लिविंग विद अ सुपरस्टार सैफअली खान' छोट्या पडद्यावर ?

googlenewsNext
िविंग विद अ सुपरस्टार' या शोच्या माध्यमातून नवाब सैफ अली खान छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.दिग्दर्शक समर खान हा शो बनवणार असून या शोच्या माध्यमातून सैफअली खानच्या आयुष्यातील सगळ्या घडमोडी उलगडण्यात येणार आहे.सैफअली खानचे नातेसंबध, त्याच्या पहिल्या लग्नापासू ते करिना कपूर खानसह लग्नाविषयीच्या सगळ्या गोष्टींवर सत्यता मांडण्याचा या शोचा प्रयत्न असणार आहे.या शोमुळे सैफअली खानचे नवाबी आयुष्य आणि काही खास गोष्टींचे रहस्य जाणून घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. टीएलसी चॅनलवर या शोचे प्रसारण होणार असून हा शो नेमका कोणत्या तारखेला प्रसारित केला जाणार याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

याविषयी सैफ म्हणाला.हा शोमध्ये फक्त चांगल्या आणि सत्यगोष्टींवर आधारित असणार आहे.  उगाच कुठेही ड्रामा वाटेल म्हणून मिर्ची मसाला लावून कोणत्याही गोष्टी दाखवल्या जाणार नाहीयेत. हा शो इतका चांगला असावा जेणेकरून पुढे मी माझा जीवनवृत्तांत म्हणून या शोकडे पाहिन.या शोच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात मला आलेले अविस्मरणीय अनुभव मी रसिकांशी शेअर करणार आहे. माझ्या सगळ्या चाहत्यांनाही हा शो आवडेल अशी आशा करतो. 


सा-यांनाच फिल्मस्टारच्या आयुष्यातील घडणारा-या घडामोडी जाणून घ्यायला आवडतात. त्यामुळेच हा शो बनवण्यात आला आहे.यापूर्वी कलाकारांचे आयुष्य छोट्या पडद्यावर मांडणारे अनेक शो आपण पाहिले आहेत.'रॉन्दवू विथ सिमी गरेवाल', जीना इसी का नाम,हे दोन्ही टॉक शो लोकप्रिय ठरले होते. आता सध्या कॉफी विथ करण, यारों की बारात असे टॉक शो  रसिकांचे मनोरंजन करतायेत. याच यादीत आता 2017 मध्ये 'लिविंग विद अ सुपरस्टार' हा शो पाहणे एक पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: 'Living with a superstar Saif Ali Khan' on a small screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.