LMOTY 2018 : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर’ पुरस्काराने ऋतुजा बागवेचा सन्मान; ‘अनन्या’साठी केला गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 01:07 PM2018-04-10T13:07:15+5:302018-04-10T18:38:22+5:30

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर झेप घेणाºया मुलीची गोष्ट सांगणाºया ‘अनन्या’ या नाटकासाठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ ...

LMOTY 2018: Honor of Rituja Bagve for 'Lokmat Maharashtrian of the Year' award; Pride for 'Ananya'! | LMOTY 2018 : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर’ पुरस्काराने ऋतुजा बागवेचा सन्मान; ‘अनन्या’साठी केला गौरव!

LMOTY 2018 : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर’ पुरस्काराने ऋतुजा बागवेचा सन्मान; ‘अनन्या’साठी केला गौरव!

googlenewsNext
द्द आणि चिकाटीच्या जोरावर झेप घेणाºया मुलीची गोष्ट सांगणाºया ‘अनन्या’ या नाटकासाठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर २०१८’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ऋतुजाने ‘अनन्या’ ही भूमिका अतिशय ताकदीने आणि संवेदनशिलपणे साकारल्याचे बघावयास मिळते.

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर  पुरस्काराचे हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्र ीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामिगरी करणाºया शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात ऋतुजा बागवे हिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  



कलावंताचा चांगल्या भूमिकांचा शोध कधी संपत नाही. एखादी ‘माइलस्टोन’ अशी भूमिका साकारायला मिळावी, असे त्याचे स्वप्न असते. काहींच्या बाबतीत हे स्वप्न सत्यात उतरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ऋतुजा बागवे हिची ‘अनन्या’ या नाटकातील भूमिका आहे. नाटकात अतिशय महत्त्वाकांक्षी दाखिवलेल्या मुलीच्या जीवनात अचानक एक वादळ येते आणि तिचे भवितव्य पणाला लागते. आधी वैफल्यग्रस्त झालेल्या या मुलीच्या मनात एका क्षणी जिद्दीची ज्योत प्रज्वलित होते आणि तिच्यात होणारा हा सगळा बदल ऋतुजा बागवे हिने मोठ्या हिंमतीने नाटकात उभा केला आहे. या भूमिकेसाठी तिने काही दिवस विशेष प्रशिक्षणही घेतले आणि त्यातून ही ‘अनन्या’ रंगभूमीवर साकार झाली आहे.

Web Title: LMOTY 2018: Honor of Rituja Bagve for 'Lokmat Maharashtrian of the Year' award; Pride for 'Ananya'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.