Lock Upp: 'एका महिन्यापासून periods आलेच नाही'; शो सुरु असतानाच रडू लागली पूनम पांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:31 IST2022-04-21T16:30:43+5:302022-04-21T16:31:39+5:30
Lock Upp: तिकीट टू फिनाले टास्कमध्ये मुनव्वरचं तिला गेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे पूनमला प्रचंड वाईट वाटतं आणि ती रडू लागते.

Lock Upp: 'एका महिन्यापासून periods आलेच नाही'; शो सुरु असतानाच रडू लागली पूनम पांडे
टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर हिचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या शोमध्ये अभिनेत्री कंगना रणौत सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे तिच्या रोखठोक बोलण्यामुळे ती कायम या शोमधील स्पर्धकांना खडेबोल सुनवत असते. तर आतापर्यंत या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील सिक्रेट्स जाहीरपणे सांगितले आहेत.यामध्येच शो सुरु झाल्यापासून चर्चेत असलेल्या पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या तिच्या हेल्थ अपडेटमुळे चर्चेत येत आहे.
या शोमध्ये पूनम आणि मुनव्वर यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकदा पूनम त्याच्यासोबत तिच्या अडचणी वा तिच्या जीवनातील काही गोष्टी शेअर करत असते.मात्र, तिकीट टू फिनाले टास्कमध्ये मुनव्वरचं तिला गेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे पूनमला प्रचंड वाईट वाटतं आणि ती रडू लागते. यामध्येच ती सध्या तिला कोणत्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे हेदेखील सांगते.
हा शो सुरु झाल्यापासून पूनमची मुनव्वर, अंजली आणि सायशा यांच्यासोबत चांगली मैत्री होती. मात्र, या तिघांनी मिळूनच तिला शोमधून बाहेर काढायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर तिला या शोमध्ये राहायचं नाही हे कारणंही दिलं. ज्यामुळे पूनमला प्रचंड वाईट वाटलं. यावेळी तिचे हेल्थ इश्शू सुरु असल्यामुळे तिला टास्कमध्ये नीट खेळता येत नसल्याचं तिने सांगितलं.
''मला मागच्या एक महिन्यापासून पिरिअड्स आले नाहीत. ज्यामुळे मला हेल्थ इश्शूला सामोरं जावं लागत आहे'', असं तिने प्रिंसला सांगितलं. त्यानंतर ती मुनव्वरलादेखील याविषयी फटकारलं. "तू प्रत्येक टास्कमध्ये जिंकावास म्हणून मी प्रयत्न करत आले. मला काही शारीरिक समस्या जाणवत आहेत ज्या मी कॅमेरासमोर बोलू शकत नाही. मला अनेकदा हॉस्पिटलमध्येल जावं लागत.तरी सुद्धा मी या शोमध्ये सहभाग घेतला आणि हा खेळ खेळतीये", असं पूनम म्हणाली.
दरम्यान, पूनमे मुनव्वरला फटकारल्यानंतर त्याने प्रिंस नरुलासोबत याविषयी चर्चा केली. 'पूनम खोटं बोलते. कारण, एक महिन्यापूर्वीच एका टास्कमध्ये तिने मला सांगितलं की तिला पिरिअड्सचा त्रास होतोय. परंतु, तरीदेखील तिने तिचं बेस्ट दिलं'. त्यामुळे आता या घटनेनंतर पूनम आणि मुनव्वर यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.