आईच्या मैत्रिणीसोबत होते 'या' अभिनेत्याचे संबंध; 'Lock Upp' अॅक्टरने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:45 PM2022-03-14T15:45:57+5:302022-03-14T15:46:36+5:30
Lock upp: नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा खुलासा करायचा होता. यामध्ये शिवमने त्याच्या जीवनातील खुलासा केला
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत येणाऱ्या अभिनेत्री कंगणा रणौतचा लॉक अप हा रिअॅलिटी शो अलिकडेच सुरु झाला आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक त्यांच्या जीवनातील अनेक धक्कादायक प्रसंग, घटना खुलेपणाने सांगताना दिसत आहेत. अलिकडेच साईशा शिंदेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासे केले होते. तर, पूनम पांडेनेदेखील तिच्या पतीने तिला कशाप्रकारे त्रास दिला हे सांगितलं होतं. यामध्येच आता शिवम शर्माने एक मोठा खुलासा केला आहे.
या आठवड्यात लॉक अपच्या चार्टशीटमध्ये शिवम शर्मा, करणीर वोहरा आणि पायल रोहतगी यांची नावं आली होती. त्यामुळे नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचण्यासाठी या स्पर्धकांना त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा खुलासा करायचा होता. यामध्ये शिवमने सर्वात प्रथम बजर दाबत त्याच्या जीवनातील खुलासा केला. यात शिवमने चक्क त्यांच्या आईच्या मैत्रिणीसोबतच शरीरसंबंध ठेवल्याचं त्याने जाहीरपणे सांगितलं.
"माझ्या आईची एक मैत्रीण होती, जी आमच्याच घराशेजारी रहायची आणि तिचा घटस्फोट झाला होता. या स्त्रीसोबत माझे शरीरसंबंध होते. पण हे दोघांच्या सहमतीने होतं. मात्र, यात वाईट काहीच नव्हतं. कारण, ती घटस्फोटित होती आणि मी तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. पण या गोष्टीला बराच काळ उलटून गेला. त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो", असं शिवम म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "या प्रकाराला प्रेम द्या, प्रेम घ्या असं म्हणायला हरकत नाही. कारण, आयुष्यात अनेक दु:ख असतात. त्यामुळे आपण आनंद पसरवायचं काम केलं पाहिजे."
दरम्यान, शिवमने केलेल्या या खुलाशामुळे लॉक अपमधील प्रत्येक स्पर्धकाला धक्का बसला. यात खासकरुन सारा खान जास्त शॉक झाल्याचं पाहायला मिळालं.