मुनव्वर फारुकीने केली अंजलीची फसवणूक; शो संपताच दिसला 'मिस्ट्री गर्ल'सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:17 IST2022-05-09T17:16:32+5:302022-05-09T17:17:23+5:30
Munawar faruqui: शो संपल्यानंतर मुननव्वरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यातील जवळीक पाहून मुनव्वरने अंजली अरोराची फसवणूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मुनव्वर फारुकीने केली अंजलीची फसवणूक; शो संपताच दिसला 'मिस्ट्री गर्ल'सोबत
अभिनेत्री कंगना रणौतचा लॉक अप (Lock Upp) हा शो सोशल मीडियावर चांगलाच गाजला. त्यामुळे या शोची अनेकदा बिग बॉस या रिअॅलिटी शोसोबतही तुलना झाली. अलिकडेच लॉक अपचं पहिलं पर्व पार पडलं असून या शोला त्यांचा पहिला विजेता मुनव्वर फारूकी ( Munawar Faruqui) मिळाला आहे. परंतु, लॉक अपची ट्रॉफी जिंकणारा मुनव्वर सध्या त्याच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहे.
लॉक अपमध्ये मुनव्वर आणि अंजली अरोरा यांच्यातील मैत्री चांगलीच चर्चेत राहिली होती. या शोमध्ये दिवसेंदिवस त्यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हा शो संपल्यानंतरही ते एकत्र येतील अशी शक्यता नेटकऱ्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटं झाल्याचं पाहायला मिळालं. या शोमधून बाहेर पडल्यानंतर मुनव्वर एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे.
शो संपल्यानंतर मुननव्वरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यातील जवळीक पाहून मुनव्वरने अंजली अरोराची फसवणूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
मुनव्वरने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक तरुणी दिसत असून त्याने तिला मिठी मारली आहे. परंतु, या तरुणींने चेहऱ्यासमोर मोबाईल धरला आहे. त्यामुळे तिचा चेहरा फारसा नीट दिसत नाही. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, या तरुणीचं नाव नाजिल आहे. त्यामुळे नाजिल ही मुनव्वरची रिअल लाइफ लव्ह असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
दरम्यान, लॉक अपमध्ये अंजली आणि मुनव्वरच्या मैत्रीची खूप चर्चा रंगली होती. परंतु, हा फोटो पाहिल्यानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मुनव्वर लॉक अपचा पहिला विजेता ठरला आहे. त्यामुळे त्याला लॉक अपची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षीसस्वरुपात देण्यात आले.