Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 14:42 IST2024-05-07T14:41:18+5:302024-05-07T14:42:24+5:30
'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिनेही मतदान केलं आहे.

Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क
सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज राज्यात लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावत त्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिनेही मतदान केलं आहे.
ज्ञानदाने तिच्या सोशल मीडियावर मतदानानंतर फोटो शेअर केला आहे. हाताच्या बोटावरील निळी शाई दाखवत ज्ञानदाने चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. हा फोटो शेअर करत तिने मतदानाचं महत्त्वही पटवून दिलं आहे. "मतदानाचा हक्क बजावा...! वोट करा", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ज्ञानदा रामतीर्थकरबरोबरच आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर हिनेही मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेता रितेश देशमुखने पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि आईसह मतदान केलं.