प्यार करना मना है

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2016 08:47 AM2016-06-11T08:47:05+5:302016-06-11T14:17:05+5:30

मालिका, चित्रपट करायच्या आधी प्रत्येक कलाकाराला करारबद्ध केले जाते. या करारामध्ये काही अटी नमूद केलेल्या असतात आणि या अटी ...

Love is forbidden | प्यार करना मना है

प्यार करना मना है

googlenewsNext
लिका, चित्रपट करायच्या आधी प्रत्येक कलाकाराला करारबद्ध केले जाते. या करारामध्ये काही अटी नमूद केलेल्या असतात आणि या अटी पाळणे हे कलाकारासाठी सक्तीचे असते. कलाकराने निर्मात्यांसोबत केलेला करार काही कारणास्तव तोडला तर त्याच्यावर निर्माता कारवाईदेखील करू शकतो. या करारामध्ये असलेल्या अटी या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एखादी मालिका करत असताना तुम्ही दुसरी मालिका करू शकत नाही किंवा ही मालिका ठरावीक काळापर्यंत सोडू शकत नाही अशाप्रकारच्या अटी यात असतात. पण रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेच्या निर्मात्यांनी एका वेगळ्याच करारावर आपल्या कलाकारांकडून सह्या करून घेतल्या आहेत. 
रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत अभिनेता वत्सल सेठ आणि इशिता दत्ता प्रमुख भूमिका साकारत आहेत. मालिका सुरू असताना कलाकार आपल्या सहकलाकारांसोबत तसेच मालिकेच्या टीममधील मंडळींसोबत दिवसातील कमीतकमी १०-१२ तास एकत्र घालवत असतात. अधिक काळ एकत्र असल्याने अनेकवेळा या कलाकारांमध्ये घट्ट मैत्री होते आणि काही वेळा या मैत्रीचे प्रेमातही रूपांतर होते. पण काहीही झाले तरी मालिका सुरू असताना आपल्या सहकलाकारांसोबत अथवा अपल्या टीममधील कोणत्याही व्यक्तिसोबत प्रेमप्रकरण करायचे नाही असा करारच रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या कलाकारांसोबत केलेला आहे.
मालिका सुरू असेपर्यंत मालिकेच्या टीममधील कोणत्याही व्यक्तिच्या प्रेमात पडायचे नाही असा करार करणारे हे पहिलेच प्रोडक्शन हाऊस आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता वत्सल सेठला अशाप्रकारच्या करारावर सही करण्यात काहीही गैर वाटत नाहीये. याबाबत वत्सल म्हणाला, "कोणत्याही मालिकेत अथवा चित्रपटात अशाप्रकारचा करार केला जात नाही. त्यामुळे सुरुवातीला मलादेखील हे थोडेसे विचित्र वाटले होते. पण नंतर या प्रोडक्शन हाऊसला भूतकाळात काही वाईट अनुभव आल्यामुळे त्यांनी अशाप्रकारचा करार करायचे ठरवले आहे असे मला कळले. त्यामुळे मीदेखील लगेचच या करारावर सही केली. त्यांच्यामते मालिकेतील सहकलाकारांमध्ये प्रेमप्रकरण असल्यास मालिकेच्या चित्रीकरणात काहीही व्यत्यय येत नाही. पण या जो़डप्यांचे ब्रेकअप झाल्यास त्याचे पडसाद सेटवर उमटतात. यामुळेच त्यांनी अशाप्रकारचा करार केला आहे आणि असे असूनही मी जर कोणाच्या प्रेमात पडलो तर ती जगातील सगळ्यात प्रसिद्ध प्रेमकथा बनेल असे मला वाटते", असे मजेशीर उत्तरही वत्सलने दिले.
छोट्या पडद्यावर मालिका सुरू असताना प्रेमप्रकरण झाले आणि मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान ब्रेकअपही झाले अशा अनेक जोड्या छोट्या पडद्यावर आहेत.
* श्वेता तिवारी - सिझान खान
कसौटी जिंदगी की या मालिकेत अनुराग आणि प्रेरणा यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान श्वेता आणि सिझानचे सूत जुळल्याची चर्चा होती. पण काहीच महिन्यात त्यांचे ब्रेकअपही झाले. ब्रेकअपनंतर ते दोघे एकमेकांचे तोंडही पाहायला तयार नव्हते असे म्हटले जाते. मालिकेतील प्रमुख जोडी एकमेकांशी बोलत नसल्याने चित्रीकरणाच्यावेळी संपूर्ण टीमलाच त्या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागला होता असे म्हटले जाते.



तेजश्री प्रधान - शशांक केतकर
होणार सून मी या घरची या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तेजश्री आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्नही केले. पण काहीच महिन्यांत त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. पण यानंतरही त्यांनी आपले वैयक्तिक आणि व्यवसायिक नाते वेगवेगळे ठेवले. घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतरही त्या दोघांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टी मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान येऊ दिल्या नाहीत.



शिल्पा कदम - मिहीर मिश्रा
संजीवनी या मालिकेत शिल्पा कदम आणि मिहिर मिश्रा यांनी एकत्र काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण काहीच दिवसांत त्यांचे ब्रेकअपही झाले. ब्रेकअपनंतर शिल्पाने ही मालिका सोडली तर राहुल त्या मालिकेमध्ये काम करत होता. 

Web Title: Love is forbidden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.