Bigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:11 PM2019-08-20T12:11:11+5:302019-08-20T12:37:44+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

Madhav deochake and digambar naik entered in bigg boss marathi house as i gust | Bigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके?

Bigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके?

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. कारण, आज घरामध्ये सिझन 2 चे घराबाहेर पडलेले काही सदस्य येणार आहेत... हे सदस्य घरात आल्यावर कोणते सल्ले देतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे... आज माधव देवचके आणि दिगंबर नाईक घरामध्ये जाणार आहेत... दोघेही शिवला मोलाचा सल्ला देणार आहेत... महेश मांजरेकर प्रत्येक आठवड्याला शिव आणि वीणाला जो सल्ला देतात, वा घरातील इतर सदस्य, शिवच्या घरचे जो सल्ला शिवला देऊन गेले होते तोच सल्ला आज माधव आणि दिगंबर त्याला देणार आहेत.

दिगंबर नाईक म्हणाले,”मला आज ही संधी मिळाली म्हणून मी आलो आहे. परत सांगणार नाही मी अधिकाराने सांगतो आहे तुला शेवटपर्यंत जायचे असेल तर ते तू ठरव कसं जायच. आणि प्रश्न देखील विचारला, तू सगळ्यांनाच हो म्हणतोस आणि मग कसा बदलतोस ? बघूया यावर शिव काय उत्तर देईल ? त्याला हे म्हणणे पटेल का ?

आज माधव एक सुंदर कविता शिवला ऐकवणार आहे. शिवने योग्य तो सल्ला घ्यावा त्यातून “......... दिल दुखा हे लेकीन तुटा तो नही है, उम्मीद का दामन छुटा तो नही है... माधवने शिवला समजावले देखील स्वप्न आहे ना, फार थोडेच दिवस उरले आहेत इतक्या छानप्रकारे दिवस गेले आहेत... कोणालाही तुझा कुठल्याही प्राकरचा होऊ देऊ नकोस... आणि मी काय म्हणतो आहे ते फक्त तुला कळेल आणि मला तेच हवं आहे... आता नक्की याचा अर्थ काय आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच. वीणाला माधव म्हणाला तुला काहीच सांगायची गरज नाही कारण तुला जे पटत तेच तू करतेस”... आजच्या भागामध्ये अजून कोण कोण आले ? त्यांनी सदस्यांना काय सांगितले ? काय धम्माल मस्ती केली ?

Web Title: Madhav deochake and digambar naik entered in bigg boss marathi house as i gust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.