चार वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ‘मधुबाला’ फेम अभिनेता विविएन डीसेना याने पत्नी वाहबिज दोराबजीला दिला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:09 PM2021-12-27T17:09:57+5:302021-12-27T17:12:34+5:30
Vivian Dsena-Vahbbiz Dorabjee divorces: प्रसिद्ध अभिनेता Vivian Dsena हा त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत सध्या खूप चर्चेत आहे. विविएन डीसेना याने पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री Vahbbiz Dorabjee हिच्यापासून अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला आहे.
नवी दिल्ली - मधुबाला आणि शक्ती- अस्तित्व के एहसास यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेला प्रसिद्ध अभिनेता विविएन डीसेना हा त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत सध्या खूप चर्चेत आहे. विविएन डीसेना याने पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजी हिच्यापासून अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला आहे. या दोघांनीही २०१७ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विविएन डीसेना आणि वाहबिज दोराबजी यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू होता.
दरम्यान, आता १८ डिसेंबर रोजी दोघांनीही अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला आहे. याबाबत केलेल्या घोषणेमध्ये विविएन आणि वाहबिज म्हणाले की, आम्ही दोघेही एकमेकांपासून कायदेशीररीत्या वेगळे झालो आहोत आणि आम्ही घटस्फोटीत आहोत, अशी अत्यंत दु:खाने आम्ही घोषणा करत आहोत. काही वर्षांपासून आम्ही काही शक्यता पडताळून पाहत होतो. दरम्यान, आता आम्ही आपल्या जीवनाची पुढील वाटचाल ही वेगळे राहून करू. हा निर्णय आम्ही परस्पर सहमतीने घेतला आहे.
विविएन डीसेना आणि वाहबिज दोराबजी हे प्यार की एक कहानी या मालिकेदरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केले. अखेरीस त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. तसेच २०१३ मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. मात्र त्यांचे लग्न केवळ चार वर्षेच टिकले. २०१७ मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता विविएन आणि वाहबिज एकमेकांपासून अधिकृतरीत्या वेगळे झाले आहेत.