१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:59 AM2024-10-23T08:59:57+5:302024-10-23T09:00:22+5:30

मालिकाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आई झालीय. लग्नाच्या ९ वर्षांनंतर अभिनेत्री आणि तिचा पती आई-बाबा झाले आहेत

madhubala fame actress Drashti Dhami Blessed with baby girl after 10 months | १० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन

१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी आई झालीय. वयाच्या ३९ व्या वर्षी आई झाल्याने दृष्टीच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंय. विशेष म्हणजे ९ महिने उलटले तरीही डिलिव्हरी न झाल्याने दृष्टी चिंताग्रस्त होती. अखेर काल रात्री दृष्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केलीय. दृष्टीने मुलीला जन्म दिला आहे. यामुळे दृष्टी आणि तिचे पती नीरज खेमका हे दोघे आई-बाबा झाले आहेत.

३९ व्या वर्षी झाली आई

'मधुबाला' मालिकेमुळे दृष्टी धामी प्रसिद्धीच्या झोतात आली. काहीच दिवसांपूर्वी दृष्टीने ९ महिने झाले तरीही बाळ होत नाहीय म्हणून काळजी व्यक्त केली होती. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने फॅन्ससोबत दुःख शेअर केलं. अखेर १० व्या महिन्यात दृष्टी आई झाल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय. "स्वर्गातून आमच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याचं आगमन. २२.१०.२४ एक नवी सुरुवात." अशी पोस्ट करुन दृष्टी आणि नीरजने मुलगी झाल्याबद्दल आनंद साजरा केलाय.


 


४२ आठवड्यांनंतर झाली डिलिव्हरी

दृष्टीने'गीत','मधुबाला','दिल मिल गए','परदेस मे है मेरा दिल' ,'एक था राजा एक थी रानी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'द एम्पायर','दुरंगा' या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती. तिने २०१५ साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ९ वर्षांनी आणि तब्बल ४२ आठवड्यांनी आईबाबा झाल्याने दृष्टी - नीरज हे दोघेही आनंदात आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार दृष्टी आणि नीरजचं या आनंदाच्या बातमीसाठी कमेंट्स करुन अभिनंदन करत आहेत.

Web Title: madhubala fame actress Drashti Dhami Blessed with baby girl after 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.