"राजकारणात येणार का?" प्रश्नावर 'आई कुठे...' फेम मधुराणीचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, 'कलाकार...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 01:53 PM2023-07-23T13:53:43+5:302023-07-23T13:54:42+5:30
लग्न, घटस्फोटोवरही तिने या आपलं मत व्यक्त केलं.
छोट्या पडद्यावर चर्चेत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते?'. अगदी पहिल्यापासूनच ही मालिका लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. सोबतच मुख्य अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) सुद्धा घराघरात पोहोचली. सध्या सगळीकडे मधुराणी खऱ्या आयुष्यात घटस्फोट घेतेय का या चर्चांना उधाण आलं. पण तिनेच स्वत: एका मुलाखतीत यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. याच मुलाखतीत तिला राजकारणात येणार का यावरही प्रश्न विचारण्यात आला.
इसापनिती या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीला राजकारणात एंट्रीविषयी विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, 'नाही मी राजकारणापासून लांबच राहते. मी इव्हेंट्स करतच नाही. मालिका गाजल्यापासून मला दर आठवड्याला उद्घाटन, हळदीकुंकू सारख्या इव्हेंट्ससाठी कॉल येतात. खूप पैसे मिळतात त्यात. म्हणजे मी तसं केलं असतं तर आतापर्यंत मुंबईत एखादं घर बांधू शकले असते.पण मी इथे अभिनय करायला आले आहे मला वाटतं त्यावरचा फोकस हलता कामा नये. इव्हेंटमध्ये अनेकदा राजकारण असतं त्यामुळे मी नाहीच जात. तो वेगळा पिंड आहे मी कलाकार म्हणूनच मरेन राजकारणी नाही होणार.'
मधुराणीच्या या उत्तराने प्रत्येकाचंच मन जिंकलं. कला क्षेत्रातून राहूनच या माध्यमातून महिलांसाठी काहीतरी करेन असंही ती म्हणाली. तिने आपले अनेक विचार या मुलाखतीत स्पष्ट केलं. तसंच नवऱ्यासोबत सुरु केलेल्या 'मिरॅकल' अकादमीचा राजीनामा का दिला यावर सांगताना ती म्हणाली, 'शूटमध्येच माझे १२ ते १२ तास जातात. त्यानंतर मुलीला वेळ देणं. यामुळे अॅकॅडमीकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग अशा परिस्थितीत मी संचालक पदावर राहून काय करु, असं ती म्हणली.