'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरनं दिला राजीनामा, म्हणाली - 'माझा आता कोणताही संबंध नसेल..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:56 IST2023-06-29T12:55:59+5:302023-06-29T12:56:40+5:30
Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरनं दिला राजीनामा, म्हणाली - 'माझा आता कोणताही संबंध नसेल..'
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. या मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा राजीनामा दिला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, कृपया नोंद घ्यावी. मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड ही मी आणि प्रमोद (प्रभुलकर) आम्ही दोघांनी मिळून सुरु केलेली संस्था. अभिनय प्रशिक्षणाबरोबरच इतरही अनेक कल्पक उपक्रम संस्थेमार्फत आम्ही केले. परंतु माझ्या विविध क्षेत्रातील वाढलेल्या व्यस्ततेमुळे मला संस्थेच्या दैनंदिन कार्यकारिणीत लक्ष घालता येत नाही. तरी समन्वयाने निर्णय घेत मी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. संस्थेशी माझा आता कोणताही संबंध नाही तरी शुभेच्छा कायम असतीलच.
वर्कफ्रंटबद्दल...
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.