Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:30 IST2025-03-04T13:29:47+5:302025-03-04T13:30:10+5:30
मधुराणी प्रभुलकरने वाढदिवशी तिला आलेला खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (madhurani prabhulkar, aai kuthe kay karte)

Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. (madhurani prabhulkar) मधुराणीला आपण विविध सिनेमा अन् मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मधुराणी ही मालिका संपल्यावरही तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. मधुराणी या मालिकेनंतर 'ज्याचा त्याचा विठ्ठल' हा एक आगळावेगळा प्रयोग रंगभूमीवर करत आहे. मधुराणीने तिच्या वाढदिवशी हा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात केला. त्यानंतर मधुराणीने तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय.
मधुराणीने सांगितला वाढदिवसाचा भन्नाट अनुभव
मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत प्रयोगानंतर मधुराणीला भेटायला तिचे चाहते आले आहेत. या चाहत्यांनी मधुराणीला कडकडून मिठी मारली. त्यावेळी मधुराणीच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसत असून ती भावुक झाली. मधुराणी हा खास व्हिडीओ शेअर करुन लिहिते की, "Housefull वाढदिवस…!!!! कृतज्ञ…. निव्वळ कृतज्ञ …!!!
“शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना..” डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य.. “ज्याचा त्याचा विठ्ठल” या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा! मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित. Housefull गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद!! कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस!! आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला?!" अशी पोस्ट लिहून मधुराणीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.