"मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:10 PM2023-12-29T13:10:10+5:302023-12-29T13:11:00+5:30

Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेतील अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या संदर्भातला किस्सा सांगितला आहे.

Madhurani Prabhulkar told the story of 'Angai' in 'Aai Kuthe Kay Karte', "I was playing with myself in my mind". | "मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा

"मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा


स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने सुरूवातीपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने मालिकेतील एक किस्सा शेअर केला आहे.

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेतील अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, डेली सोप म्हणजे जवळपास रोजच शूटिंग. आणि त्यात एखादा दिवस म्हणजे परीक्षा असते. मला या गाण्याचं शूट करायचं होतं त्यादिवशी प्रचंड मायग्रेनचा त्रास होत होता. पण काम करणं प्राप्त होतं.

ती पुढे म्हणाली की, सेटवर गेल्यावर मला 'ही' अंगाई गायची आहे हे समजलं. सलीलच्या चाली गायला अवघड असतात. ती बसवायची आणि लाईव्ह गायची इतकं डोकं ठणठणत असताना.. म्हणजे मला अजूनच टेन्शन आलं. पण संदीपच्या शब्दात आणि सलीलच्या चालीत जादू असते. जसं मी गाणं गुणगुणायला लागले तसं मला शांत वाटायला लागलं आणि गाण्यात त्या बाळाला मी थोपटत आहे खरी पण मनात मी स्वतःला जणू जोजवत होते. संगीताची जादू ती हीच. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, अप्रतिम मधुराणी मॅम. तुमचा आवाज छान आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, अगदी खरं...सलील सरांनी दिलेलं प्रत्येक गाणं हे वरवर जरी सोपं वाटत असलं तरी गातांना तितकं सहज नसतं...पण त्यांनी संगीत दिलेलं गाणं नेहमीच आपल्याला शांत करत जातं...मी देखील अनुभवलंय. आणखी एकाने लिहिले की, खूप सुंदर आई साहेब. अप्रतिम या मातेला या प्रेमाला उपमा नाही. मधू मॅडम. आणखी एकाने लिहिले की, खरं आहे ,अंगाईची हीच तर जादू आहे. ती बाळाला निजवता निजवता आईला देखील सुखावते.
 

Web Title: Madhurani Prabhulkar told the story of 'Angai' in 'Aai Kuthe Kay Karte', "I was playing with myself in my mind".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.