"किती झरझर मोठ्या होतात लेकी...", मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:20 PM2024-01-15T19:20:47+5:302024-01-15T19:21:05+5:30

Madhurani Prabhulkar : नुकतेच मधुराणी प्रभुलकर हिने लेकी आणि भाचीसोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

Madhurani Prabhulkar's special post for daughter and niece | "किती झरझर मोठ्या होतात लेकी...", मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट

"किती झरझर मोठ्या होतात लेकी...", मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आईची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. तिने साकारलेली अरुंधती घराघरात लोकप्रिय झाली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून अपडेट देत असते. दरम्यान नुकतेच तिने लेक आणि भाचीसोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आत्ता आत्ता हाताचा पाळणा करून जोजवत होतो ह्यांना... बघता बघता आपल्या उंचीला आल्यासुद्धा... किती झरझर मोठ्या होतात लेकी... माझी भाची इरा आणि स्वराली बरोबरची मैत्री मोमेंट..! मधुराणीच्या पोस्टवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
एका चाहत्याने लिहिले की, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मकर संक्रांतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. दुसऱ्या चाहतीने लिहिले की, हाताच्या पाळण्यातल्या गोड पर्‍या तुझ्या आत्ता जवळच्या सख्याच झाल्या .खुप छान क्षण.जपुन ठेव हृदयात. आणखी एकाने लिहिले खरं आहे. तर मधुराणीची बहिण अमृताने म्हटले, खरंच गं.

वर्कफ्रंट...
मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.  

Web Title: Madhurani Prabhulkar's special post for daughter and niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.