'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:03 PM2018-08-24T16:03:26+5:302018-08-25T06:30:00+5:30

कलर्सच्या 'डान्स दिवाने' शोमध्ये भाऊ व बहिणीचे सुंदर नाते साजरे केले जाणार आहे या आठवड्याच्या विशेष भागात

 Madhuri became emotional on the stage of 'Dance Diwane' | 'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी झाली भावूक

'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी झाली भावूक

googlenewsNext
ठळक मुद्देएक परफॉर्मेन्स पाहुन माधुरी दीक्षित इमोनल झाली

कलर्सच्या 'डान्स दिवाने' शोमध्ये भाऊ व बहिणीचे सुंदर नाते साजरे केले जाणार आहे या आठवड्याच्या विशेष भागात. हा भाग अतिशय विशेष असणार आहे कारण सर्व स्पर्धकांची भावंडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सेटवर येणार आहेत.

डान्स दिवानेचे स्पर्धकांनी अतिशय सुंदररित्या त्यांच्या कामगिरीतून आजच्या पिढीची वास्तविकता दाखवून दिली आणि विविध परिस्थितीमुळे भावंडांना एकमेकांपासून लांब कसे रहावे लागत आहे ते दाखविले, मग ते शिक्षणासाठी असो किंवा व्यावसायिक कारणासाठी लांब रहाणे असो. मोंगिया आणि मानसी ध्रुव यांनी सादर केलेल्या ये मोह मोह के धागे तून ही भावना प्रकर्षाने पुढे आली. त्यांची कामगिरी पाहिल्यानंतर माधुरी दीक्षितला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. माधुरीने सांगितले, “ही कामगिरी पाहिल्यानंतर मला माझ्या भावाची अतिशय आठवण आली. आताच्या काळात अनेक भावंडांना व्यावसायिक कारणांमुळे एकमेकांपासून लांब रहावे लागते. तसेच माझ्या भावालाही रहावे लागते. याच कारणासाठी माझ्या भावालाही अमेरिकेला जावे लागले आहे आणि मला त्याची आठवण येत आहे. या रक्षाबंधनला सुध्दा आम्ही एकत्र येणार नाही आणि हे खूपच अवघड आहे.”

वातावरण हलके करण्यासाठी तुषार आणि शशांक यांनी माधुरीला सुचविले की तिने आता अर्जुन बिजलानीला राखी बांधावी म्हणजे तो तिच्या भावाची जागा भरून काढेल. अर्जुन तेथून पळून चालला होता आणि या गंमतीदार क्षणात भर घालण्यासाठी अर्जुनला पकडून ठेवण्यात आले होते. तथापि, अर्जुन तेवढा चलाख होता की पळून जाण्यात यशस्वी झाला.
 

Web Title:  Madhuri became emotional on the stage of 'Dance Diwane'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.