"झुकेगा नहीं साला" हा डायलॉग उदयनराजे भोसले यांच्यासाठी", माधुरी पवार काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:56 IST2025-01-30T12:56:32+5:302025-01-30T12:56:46+5:30
माधुरी पवार मूळची साताऱ्याची आहे.

"झुकेगा नहीं साला" हा डायलॉग उदयनराजे भोसले यांच्यासाठी", माधुरी पवार काय म्हणाली?
Madhuri Pawar: माधुरी पवार हे नाव मराठी कलाविश्वासाठी आता नवीन राहिलेलं नाही. अथक मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर माधुरीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. माधुरी पवार मूळची साताऱ्याची आहे. नुकतंच माधुरी पवारनं साताऱ्याचे महाराज छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांचं कौतुक केलं. पुष्मा २ सिनेमातील "झुकेगा नहीं साला" डायलॉग उदयानराजेंसाठीच असल्याचं तिनं म्हटलं.
माधुरी पवारनं नुकतंच 'आरपार'ला मुलाखत दिली. यावेळी साताऱ्याची काय काय वैशिष्ट्य आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना तिनं म्हटलं, "साताऱ्याला एक इतिहास आहे आणि महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे मी त्या भूमीत जन्म घेतलाय, याचा सार्थ अभिमान, गर्व आहे. त्या भूमीमध्ये जे पिकतंय, ते आता तुम्हाला दिसतंय. व्यक्तीच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला दिसतायत. ती व्यक्ती जेवढी प्रेमळ आहे तेवढीच ती क्रोधीसुद्धा आहे. जे चांगलं आहे, ते चांगलंच आहे, जे वाईट आहे, ते चुकीचं आहे".
उदयनराजे यांचं कौतुक करत ती म्हणाली,, "साताऱ्याचे महाराज आता छत्रपती उदयनराजे तुम्हाला माहितीच आहेत. "झुकेगा नहीं साला" डायलॉग साताऱ्याचे महाराज छत्रपती उदयनराजे यांच्यासाठीच आहे. मी त्यांना लहानपणापासून पाहिलेय, ते कधी कुणासमोर झुकले नाहीत. अजुनही झुकत नाही. ते राजा माणूस आहेत. कधी अशी समोरासमोर त्यांची माझी भेट झाली नाही. पण, त्यांनी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी चांगल्या बोलल्यात आणि केल्यात. साताऱ्याची पोरगी आहे, जिंकून यायचं, लढ तू बिनधास्त, असं ते म्हणाले होते. हे साताऱ्यातल्या माणसांमध्ये असतं. सातारा म्हटलं की ते फार जवळ वाटतं".
माधुरी पवार ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते, नवे फोटोही ती कायम शेअर करत असते. तिनं 'देवमाणूस’, 'रानबाजार' यामध्ये काम केलेलं आहे. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. 'अप्सरा आली' या रिअॅलिटी शोमधून ती घराघरांत पोहचली होती. अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास भारावून टाकणारा आहे.