VIDEO : जादुगाराचा खेळ पाहून मलायकाला बसला धक्का तर विक्की कौशल झाला अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 03:17 PM2022-03-12T15:17:32+5:302022-03-12T15:22:41+5:30

India's Got Talent : शोमध्ये येणारे लोक आपल्या टॅलेंटने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर जजना पण धक्का देतात. असाच एक स्पर्धक शोमध्ये आला आणि सर्वांना हैराण करून गेला.

Magician act stunned Malaika Arora, Vicky Kaushal and Karan Johar at India's Got Talent- | VIDEO : जादुगाराचा खेळ पाहून मलायकाला बसला धक्का तर विक्की कौशल झाला अवाक्...

VIDEO : जादुगाराचा खेळ पाहून मलायकाला बसला धक्का तर विक्की कौशल झाला अवाक्...

googlenewsNext

(Image Credit : Aajtak)

इंडियाज गॉट टॅलेंट (India's Got Talent) टीव्हीवरील एक असा शो आहे जो बघण्यासाठी लोक उत्सुक असतात. या शोमध्ये लोकांचं वेगवेगळं टॅलेंट बघायला मिळतं. इथे येणारे लोक आपल्या टॅलेंटने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर जजना पण धक्का देतात. असाच एक स्पर्धक शोमध्ये आला आणि सर्वांना हैराण करून गेला.

इंडियाज गॉट टॅलेंट शोची खासियत म्हणजे या शोच्या प्रत्येक सीझनने लोकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. नुकताच या शोमध्ये एक जादुगार येऊन गेला. त्याने यावेळी असा काही कारनामा केला की, गेस्ट म्हणून आलेला अभिनेता विक्की कौशलही अवाक् झाला. भुवनेश्वरहून आलेल्या या जादुगाराचं नवा आहे विष्णु.

विष्णु चेहऱ्यावर हसू घेऊन शोमध्ये एन्ट्री घेतो. नंतर समोर जाऊन आपली एक एक जादू तो दाखवू लागतो. आधी तर विष्णू मलायका अरोराच्या (Malaika Arora) हातावर कोळी आणतो. विष्णुची ही कलाकारी पाहून सगळेच अवाक् होतात. हे इतक्यावर थांबत नाही. विष्णु विक्की कौशलचा (Vicky Kaushal) एक फोटो सर्वांसमोर फाडतो आणि नंतर तो विक्कीच्या हाती देतो. काही वेळाने तो फोटो चिकटलेला दिसतो. 

त्यानंतर विष्णु करण जोहरचा (Karan Johar) फोन घेतो आणि काही इतर फोनसोबत मिश्रित करतो. नंतर ते इन्व्हलपमध्ये टाकतो आणि काही वेळाने एका एका फोनवर हातोड्याने मारतो. तेव्हा मात्र करण जोहरच्या मनात धडकी भरते. पुढे नेमकं काय होतं हे तुम्ही व्हिडीओतच बघा.
 

Web Title: Magician act stunned Malaika Arora, Vicky Kaushal and Karan Johar at India's Got Talent-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.