"भगवद्गीतेचा अपमान करू नका", 'ओपेनहायमर'मधील 'त्या' सीनवर 'महाभारता'चे भीष्म संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 03:58 PM2023-07-25T15:58:41+5:302023-07-25T15:59:08+5:30

Oppenheimer : 'ओपेनहायमर'मधील 'त्या' वादग्रस्त दृश्यांवर 'महाभारत' फेम मुकेश खन्ना यांची संतप्त प्रतिक्रिया

mahabharat fame mukesh khanna angry reaction on oppenheimer bhagwatgita controversy | "भगवद्गीतेचा अपमान करू नका", 'ओपेनहायमर'मधील 'त्या' सीनवर 'महाभारता'चे भीष्म संतापले

"भगवद्गीतेचा अपमान करू नका", 'ओपेनहायमर'मधील 'त्या' सीनवर 'महाभारता'चे भीष्म संतापले

googlenewsNext

हॉलिवूड चित्रपट 'ओपेनहायमर' सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला भारतातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सिलियन मर्फी याने मुख्य भूमिका साकारली आहे. 'ओपेनहायमर' चित्रपटातील एका सीनमुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात वैज्ञानिक 'ओपेनहायमर' इंटिमेट सीनदरम्यान भगवद्गीतेतील काही ओळींचं वाचन करत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. या सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावर आता 'महाभारत' मालिकेत पितामह भीष्मची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी भाष्य केलं आहे. 

मुकेश खन्ना यांनी 'ओपेनहायमर' चित्रपटातील त्या सीनवर संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना यांनी दिग्दर्शकाला खडे बोल सुनावले आहेत. "हिंदू धर्माशी पंगा घेण्याची दिग्दर्शकांची मानसिकता कधी बदलणार? पण यावेळी बॉलिवूड नाही तर हॉलिवूडच्या दिग्दर्शकाने हे धाडस केलं आहे. ओपेनहायमर चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन यांच्याकडून ही चूक घडली आहे. आपल्या भगवद्गीतेचा अपमान झाला आहे. ही चूक सुधारली गेली पाहिजे," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...

राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिला 'छम छम करता है' गाण्याला होकार, केदार शिंदेंचा खुलासा

'ओपेनहायमर'मधील वादग्रस्त दृश्यांवर मुकेश खन्ना यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन सविस्तर व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी "हा चित्रपट चांगला आहे. ऑस्करसाठीही या चित्रपटाची निवड करण्यात येऊ शकते. 'ओपेनहायमर' यांचा भगवद्गीतेवर विश्वास होता. आणि हे त्यांनी चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशातातील लोक भगवद्गीतेचं वाचन करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. पण, चित्रपटात 'ओपेनहायमर' शारीरिक संबंधादरम्यान गीतेचं वाचन करताना दाखविण्यात आलं आहे. जे चुकीचं आहे. दिग्दर्शकाला ते दृश्य वेगळ्या पद्धतीने दाखवता आलं असतं. 'आदिपुरुष' चित्रपटातील गाण्यांचं काही जणांनी कौतुक केलं होतं. परंतु, केवळ गाण्यांमुळे चित्रपट चांगला होत नाही. त्यामुळेच या  चित्रपटाला भारतीयांनी नाकारलं. पण, तरीही काही लोकांमुळे या चित्रपटाने ४५० कोटींचा व्यवसाय केला. हिंदू धर्मीयांमध्ये एकी नाही. कोणी आपल्या धर्माचा अनादर केला, तर आपण त्यांना चोप दिला पाहिजे," असं मुकेश खन्ना यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटलं आहे. 

'ओपेनहायमर' चित्रपटातील या वादग्रस्त दृश्यांवर महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारलेल्या नीतीश भारव्दाज यांनीही प्रतिक्रिया दिली होती. नीतीश भारद्वाज यांनी या दृश्यांचं समर्थन केलं होतं. 

Web Title: mahabharat fame mukesh khanna angry reaction on oppenheimer bhagwatgita controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.