"याच खूर्चीवर बसून बाबासाहेबांनी...", लंडनमधील 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 09:42 AM2024-04-14T09:42:23+5:302024-04-14T09:43:18+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. १४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय घटनेचे शिल्पकार असणाऱ्या बाबासाहेबांना अभिवादन करून आंबेडकर जयंती साजरी केली जाते. अनेक कलाकारही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
गौरवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. लंडनमध्ये शिकत असताना बाबासाहेब अभ्यास करत असलेल्या वास्तूला गौरवने भेट दिली होती. याचा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "हिच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसून बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केला होता. त्या पवित्र वास्तूला २०२२ साली भेट दिली होती. आज १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती. थँक यू बाबासाहेब तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही," असं गौरवने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे.
दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला गौरव सध्या 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अनेक सिनेमांमध्येही गौरव झळकला आहे. 'लंडन मिसळ', 'बॉईज ४' या सिनेमांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.