इन्स्टाग्रामवर ५.६ मिलियन फॉलोअर्स अन् निवडणुकीत पडली फक्त इतकी मतं, 'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:59 IST2024-11-23T16:56:49+5:302024-11-23T16:59:51+5:30
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर ५.६ मिलियन फॉलोअर्स अन् निवडणुकीत पडली फक्त इतकी मतं, 'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारुण पराभव
Bigg Boss Fame Ajaz Khan: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. परंतु सोशल मीडियावर राजकीय विश्वाची नाही तर एका सेलिब्रिटीची जोरदार चर्चा होताना दिसते आहे. हा सेलिब्रिटी म्हणजे 'बिग बॉस पर्व-७' चा स्पर्धक एजाज खान आहे. स्वत:ला मुंबईचा भाऊ म्हणवून घेणारा एजाज खान (AjaZ khan) आपलं नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
एजाज खानला चंद्रशेखर आजाद यांच्या 'आजाद समाज पक्षा'कडून (कांशीराम) उमेदवारी मिळाली होती. परंतु आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार त्याला फक्त १४६ मतं मिळाली आहे. १८ व्या फेरीची मतमोजणी केल्यानंतरही त्याला तीन अंकी आकडा पार करता आला नाही. तर याउलट नोटाला १२१६ इतकं मतं मिळाली आहेत. त्यामुळे एजाज खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे इन्स्टाग्रामवर ५.६ मिलियन फॉलोअर्स असलेला एजाजला प्रत्यक्षात चाहत्यांनी नाकारलं आहे. या निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य मिळवता आलं नाही.
एजाज खानला विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून तिकीट मिळालं होतं. परंतु आजच्या या धक्कादायक निकालाने त्याचं चाहत्यांमध्ये हसं झाल्याचं पाहायला मिळतंय.