'कॉमेडी'च्या वादात 'ड्रामा क्वीन'ही अडकली! महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला पाठवलं समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:45 IST2025-02-21T12:45:01+5:302025-02-21T12:45:45+5:30
कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये राखी सावंतही सहभागी होती.

'कॉमेडी'च्या वादात 'ड्रामा क्वीन'ही अडकली! महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला पाठवलं समन्स
कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' शो वादात अडकला. रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद पेटला. समय रैनासह सर्वांविरोधात तक्रारी दाखल झाल्या. रणवीर आणि समयला तर समन्सही पाठवण्यात आले. परिणामी शोचे सर्व एपिसोड्स डिलीट करण्यात आले. आता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सायबर सेलने 'ड्रामा क्वीन' राखी सावंतलाही (Rakhi Sawant) समन्स पाठवले आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये राखी सावंतनेही एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. तिचा एपिसोडही आता वादात अडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला २७ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे आयडी यशस्वी यादव यांनी दिली आहे.
यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहाबादियाला समन्स पाठवण्यात आलं होतं. तर समय रैनाने १७ मार्चपर्यंत वेळ मागितला होता ज्याला सायबर सेलने नकार दिला होता. समय रैना सध्या परदेशात आहे तर रणवीर अलाहाबादियाही समोर यायला तयार नाही. तो सध्या वकीलांच्या मार्फत संवाद साधत आहे.