'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 18:23 IST2023-09-17T18:20:27+5:302023-09-17T18:23:19+5:30
गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं.

Maharashtrachi Hasya Jatra
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्याची मेजवानीच मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत. आता गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो समोर आला. हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सलग आठ दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती या प्रोमोमधून देण्यात आली आहे. "गणेशोत्सवानिमित्त खास भेट....! तुमची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सलग 8 दिवस! टीव्हीसमोर बसू या,सहकुटुंब हसू या!", असे यात म्हटले आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सोनी मराठीवरील कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. तसेच या कार्यक्रमाचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे करतात. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
शिवाय, काही दिवसांपु्र्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमने अमेरिका दौरा केला होता. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांना या मालिकेच्या टीमने खळखळून हसवलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टीमचे अमेरिका दौऱ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या टीमचा 23 दिवस अमेरिका दौरा होता.