'जगात कुठेपण जा..'; गौरव मोरेने पिझ्झा,बर्गर सोडून लंडनमध्ये मारला वडापाववर ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 05:50 PM2023-07-04T17:50:37+5:302023-07-04T17:51:33+5:30

Gaurav more: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौरवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

maharashtra hasyajatra gaurav more eat vadapav during london shooting share video | 'जगात कुठेपण जा..'; गौरव मोरेने पिझ्झा,बर्गर सोडून लंडनमध्ये मारला वडापाववर ताव

'जगात कुठेपण जा..'; गौरव मोरेने पिझ्झा,बर्गर सोडून लंडनमध्ये मारला वडापाववर ताव

googlenewsNext

फिल्टर पाड्याचा बच्चन या नावाने विशेष लोकप्रिय असलेला मराठी विनोदवीर म्हणजे गौरव मोरे (Gaurav More). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर गौरवने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहं. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप उमटविली आहे. सध्या तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला आहे. त्यामुळे तेथील अनेक व्हिडीओ, फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्याने विदेशात वडापाव खाण्याचं सुख काय असतं हे सांगितलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौरवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लंडनमध्ये वडापाव खाताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री मनिषा शिंदेदेखील दिसून येत आहे. 'जगात कुठे पण आपला वडापावच लयभारी', असं कॅप्शन देत हा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला मनिषा रस्त्यावर उभी राहून वडापाव खात असते. यावेळी गौरव तिथे येतो त्यामुळे मनिषा त्याला हाय म्हणून हाक मारते आणि, वडापाव खाणार का? असं विचारते. त्यावर “तुम्ही लंडनमध्ये येऊन पण वडापाव खाणार का? इकडंच पिझ्झा, बर्गर असं काही तरी ट्राय करा, आपण आपल्याकडे जाऊन तर हे खाणारचं ना. काय बोलणार, जाऊ दे”, असं गौरव तिला म्हणतो. आणि, तिकडून निघून जातो.

थोड्या वेळाने मनिषा पाहते तर गौरव एका ठिकाणी वडापाव खात बसलेला असतो. त्याला पाहून मनिषा विचारते, “काय वडापाव. पिझ्झा बर्गर काही खाता येत नाही का?.” त्यावर गौरव म्हणतो, “जगात कुठेही जा, वडापाव खाण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय पोट भरलंय असं वाटतच नाही.” त्यानंतर तो मनिषाला वडापाव खाणार का? असे विचारतो आणि ते दोघेही वडापाव त्याबरोबरच मिरची खातात.

दरम्यान, या व्हिडीओवरुन जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी आपल्या भारतीय पदार्थांची सर अन्य कोणत्याही पदार्थांना येणार नाही हे गौरवने या व्हिडीओतून सांगितलं आहे. तसंच मुंबईकरांचं वडापाव प्रेम म्हणजे काय हे सुद्धा त्याने यातून सुचित केलं आहे.
 

Web Title: maharashtra hasyajatra gaurav more eat vadapav during london shooting share video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.