आता वीकेएंडला मिळणार हास्याचा 'बूस्टर डोस'... कारण शनिवार आणि रविवार पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:16 PM2023-10-05T17:16:29+5:302023-10-05T17:22:38+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधील विनोदवीर प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतात

Maharashtrachi Hasya Jatra can be seen on Saturday and Sunday from 7th october | आता वीकेएंडला मिळणार हास्याचा 'बूस्टर डोस'... कारण शनिवार आणि रविवार पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

आता वीकेएंडला मिळणार हास्याचा 'बूस्टर डोस'... कारण शनिवार आणि रविवार पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधील विनोदवीर प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतात. अनेक हास्यवीरांच्या मनोरंजनविश्वातील करिअरमध्ये हास्यजत्रेचा मोठा वाटा आहे.  वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांना हसवण्यचं काम हे कलाकार करत असतात. हे कलाकार आज प्रत्येकाला घरातील एक सदस्याप्रमाणेच झाले आहेत. या साऱ्या अजबगजब पात्रांची आपल्याला इतकी सवय झालेली आहे ना की, एक जरी भाग चुकला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ७ ऑक्टोबरपासून दर शनि. आणि रवि. रात्री ९.०० वा. आपल्या पाहता येणार आहे.

सोनी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर ऑफिशयल व्हिडीओ शेअर केला आहे.  शनिवार-रविवार आपण सगळे वाट पाहत असतो. वीकेंडला आपण कुटुंबाबरोबर बाहेर जातयेत, एकत्र बसून हसता येत. हे टेन्शन घालवण्यासाठी आपण दर शनिवार आणि रविवारी पाहणार आहोत महाराष्ट्राची हास्यजत्रा असं समीर चौघुले यात बोलताना दिसतायेत. आता वीकेएंडला पोट भरून हसा... कारण शनिवार आणि रविवार दिसणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!  असं कॅप्शन या व्हिडीओसोबत दिलेलं आहे.   

 

आठवड्याभराचा क्षीण घालवता यावा  म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' वीकेएंडला म्हणजेच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या भेटीस येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ह्या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी आणि उत्सुकतेची गोष्ट असून या जत्रेतील मंडळी आता प्रेक्षकांचा वीकेएंड हसरा करण्यासाठी सज्ज आहेत. 

Web Title: Maharashtrachi Hasya Jatra can be seen on Saturday and Sunday from 7th october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.