‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं मजेशीर चॅलेंज, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 09:09 AM2024-08-12T09:09:15+5:302024-08-12T09:10:14+5:30

हास्यजत्रेतील कलाकारांचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

maharashtrachi hasya jatra fame actor shared funny video on saiyaan challenge prasad khandekar nikhil bane prithvik onkar | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं मजेशीर चॅलेंज, पाहा Video

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं मजेशीर चॅलेंज, पाहा Video

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ( Maharashtrachi Hasya Jatra ) हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. या शोमधील विनोदवीर अभिनय आणि कॉमेडीचं अफलातून समीकरण बांधत प्रेक्षकांना पूरेपूर हसवतात. केवळ हास्यजत्रेतूनच नव्हे तर सोशल मीडियावरही अनेक मजेशीर व्हिडिओ बनवत हे विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता हास्यजत्रेतील कलाकारांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

महाराष्ट्राच्या लाडक्या निखिल बने याने एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत निखिल बने, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप आणि वनिता खरात यांच्यासह हास्यजत्रेतील इतर कलाकारही दिसून येत आहे. हे सर्व जण "सैयां" हे गाणे गात आहेत. प्रत्येकाचा वेगवेगळा सूर पाहून सर्वांना हसू येत आहे. "न हसता व्हिडीओ बघा" असं कॅप्शन या व्हिडिओला निखिलने दिलं आहे.


 हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांबरोबरच सेलिब्रिटींनीसह आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने अनेक नव्या उभारत्या चेहऱ्यांना संधी देत त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं आहे. या शोमधून अफलातून अभिनय आणि विनोदाची सांगड घालत हे हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. हास्यजत्रेतील कलाकारांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 

Web Title: maharashtrachi hasya jatra fame actor shared funny video on saiyaan challenge prasad khandekar nikhil bane prithvik onkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.