नाद खुळा...! नम्रतासह पती योगेशनंही धरला हलगीवर ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:33 PM2024-09-02T12:33:35+5:302024-09-02T12:37:32+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव कामयच चर्चेत येत असते.

maharashtrachi hasya jatra fame actress namrata sambherao dance with husband for jagran gondhal in her village video viral | नाद खुळा...! नम्रतासह पती योगेशनंही धरला हलगीवर ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल

नाद खुळा...! नम्रतासह पती योगेशनंही धरला हलगीवर ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल

Namrata Sambherao Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव कामयच चर्चेत येत असते. मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. हास्यजत्रेच्या माध्यमातून तिने कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत चाहत्यांना खळखळून हसवलं. सध्या सोशल मीडियावर नम्रताचा एक व्हायरल होणारा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.


नम्रताची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते. त्याद्वारे अभिनेत्री तिच्या नवीन प्रोजेक्ट्सबरोबर  वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच नम्रताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नम्रता तिचा पती योगेशसह कोल्हापुरी हलगीवर थिरकताना दिसत आहेत. आपल्या गावी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमप्रसंगी या जोडप्याने हलगीवर ठेका धरला आहे. 

दरम्यान,अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या गावी म्हणजेच जुन्नर येथे टुमदार बंगला बांधला. नवीन घराची पूजा पार पडल्यानंतर  नम्रताने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर दिली होती. हा व्हिडीओ देखील त्याच दरम्यानचा असल्याचं कळतंय. अभिनेत्रीच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

वर्कफ्रंट-

नम्रताने वेगवेगळ्या मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे.अलिकडेच ती 'नाच गं घुमा' या सिनेमात झळकली होती. त्यामध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली.  या चित्रपटात तिने कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. शिवाय बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गाजला. 

Web Title: maharashtrachi hasya jatra fame actress namrata sambherao dance with husband for jagran gondhal in her village video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.