‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम होणार आजोबा, लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:05 PM2023-06-12T15:05:55+5:302023-06-12T15:09:01+5:30

अरूण कदम लवकर आजोबा होणार आहेत. नुकतेच त्यांच्या लेकीचं डोहाळे जेवण पार पडले.

Maharashtrachi Hasya Jatra fame Arun Kadam is going to be a grandfather | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम होणार आजोबा, लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम होणार आजोबा, लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

googlenewsNext

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi  Hasya Jatra ) या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम. अरूण कदम (Arun Kadam)यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. अरूण कदम यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सध्या अरुण कदम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

 अरूण कदम लवकर आजोबा होणार आहेत. नुकतेच त्यांच्या लेकीचं डोहाळे जेवण पार पडले.फोटो सोशल मीडियावर अरुण कदम यांनी यादरम्यानचे शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झालेत.

अरुण कदम यांची लेक सुकन्या लवकरच आई होणार आहे. सुकन्याच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो आला आहे. बाळाचे होणारे आजोबा अरुण कदम आणि त्यांची पत्नी वैशाली यांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं. 'माझ्या मुलीचे बेबी शॉवर' असं कॅप्शन त्यांनी हे फोटो शेअर करताना दिले आहे. आजोबा होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.

अरुण कदम यांची मुलगी सुकन्या ग्राफिक डिझायनर आहे. गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या अरूण कदम यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोने नवी ओळख दिली. यानंतर अनेक कॉमेडी शोमध्ये ते दिसले. आगरी भाषेवर विशेष प्रभुत्व  असलेल्या अरूण कदमांच्या तोंडून आगरी भाषा ऐकायला जाम भारी वाटते.  केवळ कॉमेडी शो नाही तर अनेक मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत.

Web Title: Maharashtrachi Hasya Jatra fame Arun Kadam is going to be a grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.