Arun Kadam : तुम्ही भेड बकरींची संतान नसून..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 10:06 AM2023-01-01T10:06:55+5:302023-01-01T10:08:02+5:30

Arun Kadam : अरूण कदम यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  याच अरूण कदम यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Maharashtrachi  Hasya Jatra fame arun kadam post about bhima koregaon | Arun Kadam : तुम्ही भेड बकरींची संतान नसून..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

Arun Kadam : तुम्ही भेड बकरींची संतान नसून..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi  Hasya Jatra ) या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम.  अरूण कदम (Arun Kadam)यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  याच अरूण कदम यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केलेल्या भाषणातील वक्तव्य अरूण कदम यांनी शेअर केलं आहे.

‘विजयस्तंभ भीमा कोरेगाम ऐतिहासिक पुरावा,’ असं त्यांनी लिहिलं आहे. ‘तुम्ही शूर वीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात...,’असं या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. त्याखाली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनांक 24-12-1927 महाडचे भाषण’ असा संदर्भ दिलेला आहे.

या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये अरूण कदम लिहितात, ‘जिथे काही कलाकार बाबा साहेबांचे विचार कितीही पटत असतील तरी त्याविषयी उघड बोलत नाहीत. कारण खूप खोलवर रूजलेली जातीव्यवस्था. पण ज्यावेळी आपल्या सारखे कलाकार गौरवोद्गार काढतात त्यावेळी खरच आपले कौतुक करावे वाटते आणि आपण दाखवलेल्या धाडसाला हा वंचित समाज कधीच विसरणार नाही,याची खात्री असू द्या...’, असं त्यांनी लिहिलं आहे.


  
गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अरूण कदम यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोने नवी ओळख दिली. यानंतर अनेक कॉमेडी शोमध्ये ते दिसले. आगरी भाषेवर विशेष प्रभुत्व  असलेल्या अरूण कदमांच्या तोंडून आगरी भाषा ऐकायला जाम भारी वाटते.  केवळ कॉमेडी शो नाही तर अनेक मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत.

Web Title: Maharashtrachi  Hasya Jatra fame arun kadam post about bhima koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.