Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची हेअरस्टाइलच बदलली, आता कसा दिसतोय फिल्टरपाड्याचा बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 13:43 IST2023-03-07T13:32:20+5:302023-03-07T13:43:02+5:30
विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्याच्या झुपकेदार केसांसाठी गौरव मोरे ओळखला जातो. मात्र आता त्याच्या नवा लूक तुम्ही पाहिलात का?

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची हेअरस्टाइलच बदलली, आता कसा दिसतोय फिल्टरपाड्याचा बच्चन
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. याच कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्यांची हेअरस्टाईल त्याला लोकप्रिय करत गेली.
गौरव मोरे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.गौरवने त्याच्या इन्स्टास्टोरीवर एक लेटेस्ट फोटो पोस्ट केला होता. यात फिल्टरपाड्याच्या बच्चनने नवीन हेअर स्टाईल केल्याची दिसतेय. विशेष म्हणजे यात गौरवचे झुपकेदार केस दिसत नाहीत. केसांचा मधला भाग उंच केलेला दिसत आहे. गौरवचा हा लूक अगदी हटके वाटत आहे. “माझी नवी हेअरस्टाइल” असे कॅप्शन त्यांच्या फोटो दिलंय.
अभिनय कौशल्याच्या जोरावर गौरवने मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप उमटविली आहे. काही दिवसांपूर्वीच तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. गौरवने ‘हवाहवाई’ चित्रपटात काम केले आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंग मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
गौरवाचं मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.