'Love You....', स्नेहल शिदमच्या 'त्या' पोस्टवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिलनेही केली कमेंट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 01:11 PM2023-09-02T13:11:54+5:302023-09-02T13:20:17+5:30
निखिल बने आणि स्नेहल शिदम या दोघांमध्ये नक्की चालंय तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुक चाहत्यांनाही लागली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (MaharashtraChi Hasya Jatra) या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे निखील बने (Nikhil Bane). एका मध्यमवर्गीय कुटुंबातून वर आलेल्या या विनोदवीराने आज अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, आजही त्याच्यातील साधेपणा प्रेक्षकांना भावतो. १ सप्टेंबरला निखीलचा वाढदिवस होता हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी बनेला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. पण यात सगळ्यात लक्ष वेधून घेतलं होतं ते स्नेहल शिदमच्या पोस्टनं. स्नेहलच्या पोस्टवर निखिलने ही प्रतिक्रिया दिली आहे.
चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमनेही बनेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निखिल बनेबरोबरचा फोटो शेअर करत "बनू डार्लिंग...हॅपी बर्थडे. लव्ह यू बेबी" असं कॅप्शनही दिलं होतं. यावर आता निखिल बननेही प्रतिक्रिया दिली आहे. निखिलने आपल्या अकाऊंटवरुन स्नेहलची ही पोस्ट रिशेअर करत थॅंक्यू डार्लिंग, लव्ह यू असे लिहिले होते. याशिवाय सोबत शेअर केलेल्या इमोजींनीसुद्धा सर्वांचे लक्ष वेधले.
याधीही महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील स्नेहलने निखिलसोबतचा एक फोटो शेअर केला आणि यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. 'पिरतीच्या फडात गं धरला हात असा काळीज येंधलं आरल .....'असं कॅप्शन स्नेहलने या फोटोला दिलं होते, मग काय? निखिल व स्नेहल यांच्यात काहीतरी नक्कीच शिजतंय, असा त्याचा अर्थ काढला गेला. यानंतर आता निखिलच्या वाढदिवसाच्या दिवशी स्नेहलने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली. त्यानंंतर दोघांमध्ये नक्की चालंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.