"माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर..", ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 09:02 AM2023-07-28T09:02:07+5:302023-07-28T09:06:51+5:30
कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). ती तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरात आहेत. ती कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. नम्रता सोशल मीडियावर सक्रीय असून तिथे शेअर केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट शेअर चर्चेत आली आहे.
नम्रताने ही पोस्ट तिच्या आयुष्यातील आदर्श व्यक्तीसाठी लिहिली आहे. ही पोस्ट तिने तिच्या मोठ्या बहिणीसाठी लिहिली आहे.
नम्रताची पोस्ट
''Happy birthday ताई मोठी बहीण माझ्या आयुष्यात मला वाटतं पहिला आदर्श कोण असेल तर मला वाटत माझी ताई दिसायला देखणी गोरी पान लांब सडक केस आणि पारदर्शक स्वभाव असलेली माझी ताई उत्तम गाते सुद्धा , मला जे काही थोडं फार गाता येतं ते ताईमुळे तिचं गाणं ऐकून ऐकुन मला हि गाणं कळलं थोडं फार , तिच्याइतकं नक्कीच नाही सगळ्यांचा विचार करणारी मनमोकळं हसणारी माझी ताई उत्तम आई सून बायको शिक्षिका तर आहेच पण उत्तम माणूस आहे तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळते ताई मला , आणि माझं आदरयुक्त प्रेम हि खूप आहे तुझ्यावर.'' नम्रताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान नम्रताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमधून तिच्यातील विनोदी गुणांचं पहिल्यांदा दर्शन झालं. यानंतर तिने कॉमेडीची बुलेट ट्रेन हा शो आपल्या कॉमेडीने गाजवला. यामुळे नम्रताला वेगळी ओळख मिळाली. यानंतरच्या काळात नम्रताने आपल्या अभिनयाची जादू रुपेरी पडद्यावरही दाखवली.