'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 01:12 PM2023-04-09T13:12:12+5:302023-04-09T13:13:18+5:30

हास्यजत्रेतून लोकप्रिय झालेली कलाकार ईशा डे हिने इन्स्टाग्रावर एक पोस्ट लिहिली.

maharashtrachi hasyajatra actress esha dey gives reply to fan who says whe everyone express in english language | 'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत

'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत

googlenewsNext

सध्या मातृभाषा सोडून इंग्रजीत संवाद साधण्याचा, इंग्रजी भाषेत व्यक्त होण्याचा ट्रेंड अधिक आहे. सोशल मीडियामुळे तर पाश्मिमात्त्य भाषाच जास्त वापरली जाते. बहुतांश पोस्टचे कॅप्शन हे इंग्रजीमध्येच लिहिण्याची सवय लागली आहे. याच मुद्द्यावरुन अनेकदा कलाकार ट्रोल होत असतात. मराठीत बोलता येत नाही का म्हणत नेटकरी त्यांना झापतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे (Esha Dey)  नुकताच असा अनुभव आला.

हास्यजत्रेतून लोकप्रिय झालेली कलाकार ईशा डे हिने इन्स्टाग्रावर एक पोस्ट लिहिली. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका बंद होत आहे त्यामुळे कलाकारही प्रेक्षकांइतकेच भावूक झाले. ईशाने पोस्ट शेअर करत इंग्रजीत कॅप्शन दिले. तिने लिहिले, '"Every story has an end. But every ending is a new beginning too!"
Here’s to hope!!  miss the office and I miss you all Team POUA!See you again soon!'



ईशाच्या या पोस्टवर एकाने कमेंट करत लिहिले, 'मराठी कलाकार समाजमाध्यमांवर व्यक्त होताना English का वापरतात कुणास ठाऊक? तका संकोच वाटत असेल का? तुमची पोस्ट पाहणारे 90-95% लोकं मराठी आहेत. बघा पटलं तर घ्या, बाकी तुमची इच्छा.'

चाहत्याच्या या कमेंटवर ईशानेही जशास तसे उत्तर दिले. तिने लिहिले, 'संकोच वाटत असता तर मराठी भाषेमध्ये काम तरी का केला असत सर? Also my language of expression is usually English आणि मला त्याचा ही संकोच वाटत नाही.
बरं आणि माझी Post पाहणारे 90-95 % लोक मराठी आहेत हे तिम्ही कसं ठरवलं ह्याची मला कल्पना नाही. P.s. तुम्ही मराठी/देवनागरी मध्ये लिहलेला “पोस्ट” हा शब्द पण इंग्रजी भाषेतला आहे.

ईशाचं हे उत्तर अनेकांना आवडले. हास्यजत्रेत ईशा नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिने लंडनमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे . अनेक मालिकांमधून ती चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सध्या ती हास्यजत्रेत काम करत आहे.

Web Title: maharashtrachi hasyajatra actress esha dey gives reply to fan who says whe everyone express in english language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.