'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 01:22 PM2023-05-22T13:22:31+5:302023-05-22T13:23:16+5:30

Maharashtrachi Hasyajatra Show : आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खुद्द हास्यजत्रेतील विनोदवीरांनी याविषयी हिंट दिली आहे.

'Maharashtrachi Hasyajatra' bids farewell to the audience, emotional posts of the artists are in discussion | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट चर्चेत

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी एक शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra). या कार्यक्रमातील विनोदवीर आपल्या अचूक कॉमिक अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खुद्द हास्यजत्रेतील विनोदवीरांनी याविषयी हिंट दिली आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रामधले कलाकार प्रियदर्शनी इंदलकर हिने महाराष्ट्राची हास्यजत्राचा सेटचा फोटो शेअर केला आणि लिहिले की,भेटूया २ महिन्यांनी, अशी प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट केलीय. अशाप्रकारे महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो २ महिन्यांचा ब्रेक घेणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार आता शेवटच्या भागांचे शूटिंग करत आहेत. हे शूटिंग करत असताना कलाकार खूप खूश आहेत. याशिवाय गौरव मोरेने सर्वांसोबत सेल्फी व्हिडिओ घेत आनेवाला पल, जानेवाला है असे गाणे वापरले आहे. शेवटचा दिवस, शेवटचे शूटिंग असे कॅप्शन देत कलाकार भावुक झाले आहेत.

याशिवाय हास्यजत्रेतील कलाकार रसिका वेंगुर्लेकरने चाहत्यांना दिलासा दिलाय. काळजी करू नका guys..शो बंद होत नाहीये. आम्ही MHJ टीम छोटीशी सुट्टी घेतोय. आम्ही लवकरच भेटू. खूप लवकर अशी पोस्ट करत रसिक वेंगुर्लेकरने चाहत्यांना माहिती दिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो बंद व्हायचे कारण म्हणजे सोनी मराठीवर लवकरच कोण होईल मराठी करोडपतीचा नवीन सीझन सुरू होतो आहे. पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर KBC मराठीचा नवीन सिझन होस्ट करताना दिसणार आहेत. २९ मेपासून, सोम. ते शनि., रात्री ९ वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे हास्यजत्रा २ महिन्याचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला रुजू होईल.

Web Title: 'Maharashtrachi Hasyajatra' bids farewell to the audience, emotional posts of the artists are in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.