अरुण कदमांच्या लेकीची नवी इनिंग! नवऱ्याबरोबर सुरू केलं नवं हॉटेल, अभिनेत्याने दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 14:30 IST2024-06-04T14:30:34+5:302024-06-04T14:30:53+5:30
अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने तिच्या पतीबरोबर हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सुकन्या आणि सागर यांनी ठाण्यात नवं हॉटेल सुरू केलं आहे.

अरुण कदमांच्या लेकीची नवी इनिंग! नवऱ्याबरोबर सुरू केलं नवं हॉटेल, अभिनेत्याने दाखवली झलक
उत्तम अभिनय आणि विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अभिनेते अरुण कदम यांनी स्थान निर्माण केलं. अनेक कॉमेडी शो आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या अरुण कदम यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. अरुण कदम यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या विनोदी शैलीचे प्रेक्षक चाहते आहेत. अरुण कदम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ते चाहत्यांना देत असतात. अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने तिच्या पतीबरोबर हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सुकन्या आणि सागर यांनी ठाण्यात नवं हॉटेल सुरू केलं आहे. ठाण्यातील कासार वडवली भागात त्यांनी २७ पाम्स रेस्टॉरंट या नावाने हॉटेल सुरू केलं आहे. नुकतंच या नव्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. याचा व्हिडिओ अरुण कदम यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत लेकीला आणि जावयाला शुभेच्छा दिल्या आहेत.
"माझे जावई आणि सुकन्या याचं कासारवडवली ठाणे (वेस्ट) 27.palms restaurant सुरू झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा", असं अरुण कदम यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत सुकन्या आणि सागर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अरुण कदम यांची लेक सुकन्या ही ग्राफिक डिझायनर आहे. सुकन्याने डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. तिच्या पतीचे नाव सागर पोवळे असं आहे. लग्नानंतर दीड वर्षांनी ते आईबाबा झाले. अरुण कदम अनेकदा नातवाबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.