'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने घटवले वजन, सांगितले फिटनेसचे सीक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:03 IST2024-05-03T15:03:20+5:302024-05-03T15:03:47+5:30
Prathamesh Shivalkar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीर प्रथमेश शिवलकरदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर वजन घटवल्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने घटवले वजन, सांगितले फिटनेसचे सीक्रेट
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. म्हणून या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीर प्रथमेश शिवलकरदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर वजन घटवल्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.
प्रथमेश शिवलकरने स्वतःचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, फॅट टू फिट होण्याच्या ३ महिन्यांच्या प्रवासानंतरचा पहिला फोटो. डाएट…व्यायाम…मसल…ट्रेनिंग…योग…मेडिटेशन…रिपिट. यामुळे सकारात्मक उत्साह मिळतो. हे स्वतःसाठी करा इतरांसाठी नको. महत्त्वाचे म्हणजे नो चीट डे. त्याची ही पोस्ट पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
प्रथमेशच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, आता ओळखता य़ेणार नाही की प्रथमेश कुठला आणि श्रमेश कुठला. दुसऱ्या युजरने लिहिले की, मला पण सांग रे डाएट प्लान तुझा. आणखी एकाने लिहिले की, एक नंबर.
वर्कफ्रंट
प्रथमेश शिवलकरबद्दल सांगायचं तर तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील लेखन आणि अभिनय या दोन्ही जबाबदारी सांभाळतो. प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर या दोघांची जोडी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये लोकप्रिय आहे. प्रथमेश - श्रमेश जोडीने विविध स्कीट एकत्र गाजवले आहेत.