Vanita Kharat Wedding : ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:35 PM2023-01-11T14:35:12+5:302023-01-11T14:36:40+5:30

Vanita Kharat Wedding : गेल्या काही दिवसांपासून वनिता लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. अर्थात लग्नाची नेमकी तारीख समोर आली नव्हती. पण आता लग्नाची तारीखही समोर आली आहे.  

Maharashtrachi Hasyajatra Fame Actress Vanita Kharat Marriage Date confirmed | Vanita Kharat Wedding : ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

Vanita Kharat Wedding : ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

googlenewsNext

Vanita Kharat Wedding : मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराई सुरू आहे. लवकरच तुमची आमची लाडकी अशी आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. आम्ही बोलतोय ते 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' फेम वनिता खरात (Vanita Kharat) हिच्याबद्दल. वनिता खरात हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आता घराघरांत तिचं नाव पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वनिता लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. अर्थात लग्नाची नेमकी तारीख समोर आली नव्हती. पण आता लग्नाची तारीखही समोर आली आहे.  

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'च्या सेवटर वनिताच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती.  अगदी कार्यक्रमातील अनेक स्किटमध्येदेखील वनिताच्या लग्नाचा उल्लेख झाला होता. आता खुद्द वनितानेच लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 

तर वनिता खरात 2 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) ती लग्नाच्या आणाभाका घेणार आहे. हे लग्न कुठे होणार? लग्नाला कोण कोण हजर राहणार? याचा खुलासा वनिताने केलेला नाही. पण लवकरच ती त्यासंदर्भात माहिती देणार आहे.  

कोण आहे वनिताचा होणारा नवरा?

वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटो  शेअर केले आहेत. वनिता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये काम करतेय. लवकरच  तिची 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.   दोन्ही मालिकांचं शूटिंग  शिवाय लग्नाची तयारी अशी  सध्या तिची कसरत सुरू आहे.  

Web Title: Maharashtrachi Hasyajatra Fame Actress Vanita Kharat Marriage Date confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.