Video: 'हास्यजत्रा' फेम अरुण कदमच्या नातवाचं गोड फोटोशूट, आजोबांनी केली नातवासोबत धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:29 PM2024-07-25T15:29:01+5:302024-07-25T15:29:27+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमच्या नातवाने खास फोटोशूट केलंय. (arun kadam)

maharashtrachi hasyajatra fame arun kadam grandson special jungle book theme photoshoot viral | Video: 'हास्यजत्रा' फेम अरुण कदमच्या नातवाचं गोड फोटोशूट, आजोबांनी केली नातवासोबत धमाल

Video: 'हास्यजत्रा' फेम अरुण कदमच्या नातवाचं गोड फोटोशूट, आजोबांनी केली नातवासोबत धमाल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम केवळ हास्यजत्राच नाही तर सिनेमे, नाटक, मालिकांमधूनही गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. अरुण कदम हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात. अरुण कदम यांची मुलगी सुकन्या काही महिन्यांपूर्वी आई झाली असून तिला मुलगा झाला. सुकन्याने लाडक्या लेकाचं खास फोटोशूट केलंय. त्यावेळी अरुण कदम नातवासोबत धमाल करताना दिसले.

अरुण कदम यांच्या नातवाचं गोड फोटोशूट

अरुण कदम यांची लेक सुकन्याने लेकाच्या फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत पाहायला मिळतं संपूर्ण कदम कुटुंब, सुकन्या आणि तिचा नवरा उपस्थित असतो. यावेळी अरुण कदम यांचा नातू फोटोशूट दरम्यान खेळताना दिसतो. फोटोशूटसाठी 'जंगल बूक' थीम ठेवलेली दिसते. नातवाचे खास क्षण कॅमेरात कैद करता यावेत म्हणून अरुण कदम त्याच्याशी खेळताना दिसतात. पुढे संपूर्ण कुटुंब आलटून पालटून सुकन्याच्या लेकासोबत फोटोशूट करतं. हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.



अरुण कदम यांच्या लेकीचं हॉटेल व्यवसायात पदार्पण

अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने तिच्या पतीबरोबर काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सुकन्या आणि सागर यांनी ठाण्यात नवं हॉटेल सुरू केलं आहे. ठाण्यातील कासार वडवली भागात त्यांनी २७ पाम्स रेस्टॉरंट या नावाने हॉटेल सुरू केलं आहे. या नव्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. याचा व्हिडिओ अरुण कदम यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत लेकीला आणि जावयाला शुभेच्छा दिल्या होत्या. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame arun kadam grandson special jungle book theme photoshoot viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.